मुकुटबनचे व्याख्याते समीर लेनगुरे यांच्या नेतृत्वात भारतीय क्रांती सेनेचा RCCPL च्या विरोधात दिव्यांग बांधवाचा मोर्चा.......
हेही वाचा : Breaking News : बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....
विदर्भ माझा न्युज 24 - मुकुटबन
CSR फंडातुन मुकुटबन येथील दिव्यांग बांधवांना न्याय मिळलाच पाहिजे याकरिता भारतीय क्रांती सेनेच्या वतीने RCCPL कंपनी मुकुटबन ला सर्व दिव्यांनी बांधवांनी राजराजेश्वर मंदिर ते कंपनी पायी चालत इन्कलाब जिंदाबाद,RCCPL मुर्दाबाद,अशा घोषणा देत निवेदन दिले.
१५ दिवसांच्या आत या निवेदनावर कंपनीकडून उत्तर मिळाले नाही तर मोठं जन आंदोलन असं करण्यात येईल असा इशारा RCCPL च्या सी.एस.आर ला देण्यात आला.
हेही वाचा : Breaking News : बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....
कंपनी कायदा २०१३ कलम १३५ नुसार ज्या परीसरात कोणतेही उत्पादन घेणारा किंवा निर्मीती करणारा प्रकल्प काम करीत असतो, त्या कंपन्यांना सी.एस.आर निधी संकलित करणे बंधनकारक आहे, ज्या कंपन्यांचा नफा ५ कोटीच्या वरती आहे,ज्यांची वार्षिक उलाढाल १००० कोटी पेक्षा जास्त आहे,अशा कंपन्यांना CSR निधी जमा करणे बंधनकारक आहे.
कंपनीमध्ये (C.S.R) करण्याकरीता वेगळा विभाग नेमुन तो निधी प्रकल्प बाधीत गाव-वस्तांमध्ये प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शिक्षण,पाणी,आरोग्य,रस्ते,दिव्यांग बांधव-भगीनी,निराधार महिला-पुरुष,वृद्धाश्रम,वाचनालय,युवक-युवती करीता रोजगार निर्मीती करीता वेगवेगळी प्रशिक्षण केंद्र उभारणी करणे यासारख्या अनेक कल्याणकारी योजना राबविणे बंधनकारक असते.
हेही वाचा : Breaking News : बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....
१५ दिवसांच्या आत या निवेदनावर कंपनीकडून उत्तर मिळाले नाही तर मोठं जन आंदोलन असं करण्यात येईल असा इशारा RCCPL च्या सी.एस.आर ला देण्यात आला.यावेळी समीर लेनगुळे,राजेश इद्दे,सागर इंगोले व सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.


