Breaking News : बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....
दिपक कैथवास याची 4 युवकांनी मिळुण केली हत्या.....
आरोपींनी केले स्वताला पोलिसांच्या स्वाधीन......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरात पुन्हा हत्या, बल्हारशाह शहरात गुन्हेगारी वाठतच चाली आसुन हत्ते ने पुन्हा शहर हादर्ले आहे. शहरातील टेकडी विभागात एका युवकाला त्याच्याच परीसरातील 4 युवकांनी मीळुण हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघळकीस आली. सवीस्तर वृत्त असे आहे की, सतत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला त्याच परिसरातील 4 जणांनी मिळून हत्या केली आहे, ही थरारक घटना 15 जुन रोजी रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास डाॅ.राजेंद्र प्रसाद वार्डात घडली आहे.
बल्हारशाह शहरातील रवींद्रनगर वार्ड, कारवा रोड येथे राहणारा 28 वर्षीय दीपक कैथवास या युवकाची 4 जणांनी मिळून हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे, हत्येनंतर 4 ही जणांनी बल्हारशाह पोलीस स्टेशनमध्ये स्वताला पोलिसांच्या स्वाधीन केले.
नेमक हत्येचं कारण काय?
दीपक कैथवास याच्यावर बल्हारशाह पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहे, तो नेहमीच कुणासोबतही वाद घालत होता, त्यामुळे परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती.दीपक हा परिसरातील नागरिकांना सुद्धा त्रास द्यायचा,आरोपी युवकांवर सुद्धा दीपक ने अनेकदा वाद घालत त्याना मारहाण केली होती, त्या मारहाणीचा सुळ व त्याची निर्माण झालेली दहशत संपविण्यासाठी रात्रीच्या सुमारास दीपक ला त्या युवकांनी गाठले, राॅड, दंडे,दगड याच्याने दिपकवर जोरदार प्रहार करण्यात आले होते. त्या मारहाणीत दीपक चा मृत्यू झाला, आरोपी हे 18 वर्षे वयाचे असल्याची माहिती आहे, घटनेचा पुढील तपास बल्हारशाह पोलीस करीत आहे.
टेकडी विभागात पोलिस चौकी ची मागनी अध्यापही अपुर्ण....
बल्हारशाह शहारत सीसीटीव्ही कॅमेरे व टेकडी विभागात एक पोलिस चौकी हवी असल्याची मागनी अनेकांनी केली आहे, तरी देखील अध्यापही पोलिस चौकी बाबद ठोस पाऊल उचले गेले नाही, नागरीकांसह अनेकांनी टेकडी विभात पोलिस चौकी व्हावी या करीता मागनी केली अस्तांना सुद्धा पोलिस विभागाने त्या अनुशंगाने ठोस पाऊच उचलेले नाही. शहरात वाठती गुन्हे गारी पहाता शहरातील कारवा रोड परीसरात पोलिस चौकी ची अत्यंत गरज असून अनेकांनी सदर मागनी या पुर्वी केली होती. आता या हत्ते नंतर पोलिस प्रशासन गुन्हेगारी प्रवृत्तीला आडा घालन्या करीत शहरातील कारवा रोड परीसरात पोलिस चौकी सुरु करण्या बाबद सकारात्मक भुमीका घेत ठोस पाऊल उचलतात का? आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे.
