Top News

Balharshah, Chandagadh tombs and the mausoleum of Balhalshah kings participate in upcoming jirnovdar of 4 historical tombs in Vidarbha - Rohit Lonare, City President, Viraaans Yuva Aghadi. and City President Jai Vidarbha Party.

बल्हारशाह, चांदागड  कील्यांचा व बल्हाळशाह राजेंच्या समाधी‌स्थळाचा सहभाग विदर्भातील 4 ऐतीहासी कील्यांच्या होणार्या जिर्नोव्दार मध्ये  करा - रोहीत लोनारे, शहर अध्यक्ष, विराआंस युवा आघाडी. तथा शहर अध्यक्ष जय विदर्भ पार्टी.



बल्हारशाह कील्लाच्या पुणर्वसनाची मागनी जुनी असतांना विदर्भातील जिर्नोद्वारा करीता निवड केलेल्या कील्यांन मध्ये बल्हारशाह व चांदागड(चंद्रपूर) कील्यांची व बल्हाळशाह राजे आत्राम यांच्या सामाधी स्थळाची नोंद का केली नाही ?  जय विदर्भ पार्टीचे बल्हारशाह शहर अध्यक्ष तथा विदर्भ राज्य आंदोलन ‌समीती चे शहर अध्यक्ष रोहित लोनारे यांचा निवेदनातुन प्रश्न....

 


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

पर्यटनाच्या दृष्टी कोनातुन विदर्भातील 4 कील्यांचा राज्य शासनाने जिर्नोव्दारा करण्यसाठी अहवाल‌ मागवीला आहे, त्यात विदर्भ राज्य आंदोलन‌ समिती,युवा आघाडी,बल्हारशाह ने शासन निर्णयाचे स्वागत करीत, जुनी मागनी असलेला बल्हारशाह कील्ला व चांदागड (चंद्रपूर) कील्ल्यांसह बल्हाळशाह राजे आत्राम यांच्या समाधी स्थळाचा सुद्धा समावेश कराशा अशी मागनी निवेदना मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे.


ऐतीहासीक बल्हारशाह नगरीत स्वतंत्र गोंड साम्राज्याचे राजे  विश्वपराक्रमी महाराजा खांडक्या बल्हाळशाह राजे यांच्या राजधानीचा  कील्ला आहे, चांदागड म्हणजेच आताचे चंद्रपूर येथे प्राचीन कील्ला बल्हाळशाह राजेने वसवीला आहे, विराआंस युवा आघाडी,बल्हारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या नेतृत्वात मागील २०२० पासुन बल्हाळशाह राजे यांच्या कील्याचे व कपुर पेट्रोलपंप मागील समाधी स्थळाचे  पुणर्वसन व संवर्धाना करीता  सातत्याने मागनी सुरू आहे, बल्हारशाह कील्याला २ कोटी निधी येऊन सुद्धा कील्याचे काम अध्याप थोडे सुद्धा झालेले नाही. 



विदर्भातील ४ कील्यांचे जिर्नोद्वार केले जात आहेत या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र जुन्या मागनी वर आपन काय विचार केला आहे? असा प्रशन देखील या निवेदना मार्फत करण्यात आला आहे. 

विदर्भातील  नगरधन,अंबाडा,मानीकगड,धारणी या कील्यांचे जिर्णोव्दार होईल मात्र बल्हारशाह शहरातील कील्ला व चंद्रपूर शहरातील कील्ला हे अती प्राचीन असुन या  गोंडकालीन कील्लांचे अध्याप पुणर्वसन झालेले नाही. 



पुरातन विभागाच्या नियमा नुसार कील्याच्या १०० मीटर परीसरात खोदकाम बांधकाम करने गुन्हा असतांना बल्हाळशाह व‌ चंद्रपूर या दोन्ही  कील्यांच्या १०० मीटर आत बांधकाम खोदकाम कसे केल्या गेले परवांगी कोनी‌ दिली? या वर कार्यवाही का नाही झाली?

चंद्रपुर कील्याच्या आतच संपुर्ण मार्केट,रुग्नालय,घरे,माॅल शासकीय कार्यालय,बॅक इ. कसे वसले यांना परवानगी कुनी‌ दीली? या गोष्टींचा विचार करून जिल्हाचे ऐतीहासीक वैभव वाचवीने गरजेचे आहे, चंद्रपूर जिल्हाचा प्राचीन इतीहास असुन जिल्हाच्या ठीकानी एकाही गोंड राजे गोंड महारानींचे स्मारक नाही, १८५७ च्या स्वतंत्र लढ्यातील विर शहीद बाबुराव शेडमाके यांचे सूद्धा स्मारक नाही, दाताळा पुलाल राजमाता हीराई रणींचे नाव देण्याची मागनी केली अस्तांना सुद्धा राम सेतु नाव त्या पुलाला देण्यात आले, ऐतीहासीक वैभव वाचवीन्याच्या द्रुष्टीने हे कीत पत योग्य आहे. 

आपन आपज पर्यंत चंद्रपूर जिल्हाच ऐतीहासीक वैभव वाचवीन्या करीता योगदान का नाही दीले? मागील पावसाळ्यात अंचलेश्वर प्रवेश द्वाराचे काही भाग ठासळले तेव्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटना स्थळी पहानी‌ करून संबंधीत विभागाला आदेश का नाही दीले, मुनगंटीवार यांचे घर अंचलेश्वर प्रवेश व्दारा पासुन फार लांब नाही मात्र तेव्हा देखील पाहनी केली गेली नाही.  


आता महाराष्ट्र शासना मार्फत विदर्भातील ४ कील्लांचे जिर्णोद्वार केले जात आहे त्यात बल्हारशाह येथील गोंड राजे खांडक्या बल्हाळशाह राजे,निलकंठशाह राजे,हीरातानी राणी यांचे समाधी स्थळ,  बल्हारशाह व‌ चंद्रपूर कील्यांचा समावेश करावा व चंद्रपूर जिल्हाचा स्वतंत्र गोंडकालीन प्राचीन इतीहास वाचवीन्या करीता आपन पुढाकार घेऊन आमच्या मागनी‌ वर विचार करून तात्काळ योग्य निर्णय घ्यावा.

वरील मागनी‌ लवकरात लवकर पुर्ण न झाल्यास जिल्हाचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरा पुढे विदर्भ राज्य आंदोलन समिती,युवा आघाडी,बल्हारशाह उपोषन करेल असे  शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी  या निवेदनात नमुद केले आहे.


पराग गुंडेवार - तालुका अध्यक्ष विराआंस युवा आघाडी बल्हारशाह तथा गोंडवाना साम्राज्य कालीन गड,कील्ले प्रेमी यांची प्रतिक्रीया


जिल्हाचे ऐतीहासीक वैभव वाचवीन्या करीता आम्ही सतत लढा कायम ठेवू,मी व‌ माझे सहकारी सातत्याने मागीन २०२० पासुन ऐतीहासीक वैभव वाचवीण्या करीता लढा देत आहोत, तसा आम्ही सातत्याने पाठ पुरावाही करत आहो. आमच्या लढा ला काही प्रमाने यश देखील मीळखले २ कीटी नगर परीषद बल्हारशाह ला कील्याच्या पुणर्वसन तथा संवर्धना करीता आले. मात्र ज्या पद्धतीने कामाची गती हवी आहे ती दीसत नाही. काम कासवगतीने सुरु आहे. संबंधीत विभागाच्या नजर अंदाज केल्याने या राजधानीच्या किल्याचे बरेच अवशेष ठासळले आहे. २०२१ मध्ये पावसाळ्यात किल्याचे बुरुजही ठासळले ज्यात कील्याला लागुन असलेल्या घराचे नुकसान देखील झाले होते. आमची मागनी ऐतीहासीक वैभव वाचवीन्या करीता असुन विदर्भातील जे ४ कील्ले जिर्णोद्वारा करीता निवड केले आहे  त्यात आणखी २ कील्ले व १ समधी‌ स्थळाचा समावेश  जिल्हाचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार‌ हे करतील असा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते नक्कीच ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‌यांच्या लक्षात आणुन देतील आणी बल्हारशाह कील्ला, चांदागड कील्ला व‌ बल्हाळशाह राजे आत्राम समाधी स्थळ,बल्हारशाह चा समावेश करतील.

Previous Post Next Post