Top News

Self at Korpana. Tribute to MP Balu Dhanorkar

कोरपना येथे स्व. खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार स्व. बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे ३० मे २०२३ रोज मंगळवारला दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता कोरपना तालुका काँग्रेस कमिटी कोरपना च्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम  आज दि.12/06/2023 ला 12:00 वाजता राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या हॉल येथे संपन्न झाला. 

सदर श्रद्धांजली कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे , तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती शाम रणदिवे, सभापती अशोक बावणे , सीताराम कोडापे, संभाजी कोवे ,  भाऊ चव्हाण ,रसूल पटेल , इरफान शेख , रहेमान भाई, विनोद नवले ,  राहुल मालेकर , इस्माईल शेख , निसार शेख ,अनिल गोंडे, मिथुन हेरेकुमरे सह असंख्य काॅंग्रेस पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थीत होते. सदर श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन रोशन आस्वले यांनी केले तर आभार प्रशांत लोडे यांनी मानले.



   

Previous Post Next Post