Top News

Stop the exploitation of employees immediately...Ajay Dubey's message to CEO....... NP Balharshah should take action and give justice to the employees quickly.... Otherwise we will protest strongly. - Ajay Dube Pradesh Chief Minister BJP Worker Morcha

कर्मचार्यांचे शोषण त्वरीत थांबवा...अजय दूबे यांचे मुख्याधीकार्यांना निवेदन.......


न.प.बल्हरशाहने कारवाई करून कर्मचार्यांना‌ त्वरीत न्याय द्यावा....


अन्यथा तीव्र आंदोलन करू. - अजय दूबे प्रदेश सरचीटनीस भाजप कामगार मोर्चा




 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

 बल्हारशाह नगरपरिषदे चे अधिकारी आणि भारत इंटेलिजेंस सिक्योरिटी फोर्स संगनमताने नगर परिषद मध्ये आउटसोर्सिंगचे काम करणारे कर्मचार्यांचे शोषण करीत आहे. असा आरोप भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश सरचिटनिस अजय दुबे यांनी केला आहे  सुधीर मुनगंटीवार, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, सहाय्यक श्रम आयुक्त चंद्रपुर आणि मुख्याधिकारी नगर परिषद बल्हारशाह यांना सादर केलेल्या निवेदनात कर्मचार्‍यांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणी अजय दूबे यांनी केलेली आहे. 

वरील एजन्सीला शासनाकडून 22 हजार मिळून, ही केवळ सहा ते सात हजार रुपये कर्मचाऱ्यांना दिले जातात. नियमाविरुद्ध सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून 12 तास ड्युटी घेऊन केवळ 6 हजार रू.कंप्यूटर्स आपरेटर्स आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्यांना फक्त 7 हज़ार रु.दिले जातात. पीएफ ही नियमित भरला जात नाही. पगाराची स्लिप ही दिली जात नाही. पगारवाढ आणि पीएफची मागणी करणाऱ्यांना तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो. शिंदे फडणवीस सरकार पारदर्शक कारभार करून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे भारत इंटेलिजेंस सिक्योरिटी फोर्स सारख्या एजन्सी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहेत आणि सरकारच्या नियमांची पायमल्ली करत त्यांचे शोषण करित आहेत. नगर परिषद सदर प्रकरणाचा तपास करुण एजन्सी वर कार्रवाई करुण कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा भाजपा कामगार मोर्चा द्वारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा कामगार मोर्चा कडून देन्यात आला आहे.

Previous Post Next Post