Top News

A farmer who went to tobani died of poisoning....

टोबानी करायला गेलेल्या शेतकऱ्यांचा विष बाधेने मृत्यू....




 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड ( चंद्रपूर ) 


 येथुन जवळच असलेल्या येरूर येथील देवराव रामाजी असूटकर वय ५५ वर्ष या शेतकऱ्याचा शेतात कपाशीची टोबानी करायला गेले असता कपाशीच्या बियाना औषध लावताना विष बाधा झाली व त्यांची प्रकृती खालावली असता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता चिकीत्सकांनी त्यांना मृत्य घोषित केले ही घटना काल ता. २३  रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांच्या पेरणीची लगबग सुरू झाल्याने सर्च शेतकरी पेरणी करायला लागले आहे. अश्यातच येरूर येथील शेतकरी देवराव रामाजी असुटकर हे देखील आपल्या शेतात कपाशी टोबानीसाठी करायला गेले असता कपाशीच्या सरकीला टोबानी करायच्या अगोदर त्यांना विषारी औषध लावले असता त्या औषधाची विष बाधा त्यांना ही झाली व त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला व त्यांना भोवळ आली आणीबते खाली पडले असता शेतातील इतर मजुरांनी आरडा ओरड केली असता शेजारील शेतकऱ्यांनी त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील चिकित्सकांनी त्यांना मृत्य घोषित केले असता त्यांची उत्तरीय चाचणी करून आज ता. २४ रोजी त्यांसवर येरुर येथे अंत्यविधी करण्यात आला. त्यांचे प्रच्छत त्यांची पत्नी व एक मुलगी आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची नोंद पडोली पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.

Previous Post Next Post