तलाठी दयानंद येरडलावार यांची धाडसी कारवाई....सायफळ येथील 36 ब्रास वाळू साठा जप्त.....
विदर्भ माझा न्युज 24 - माहूर
पैनगंगा नदी पत्रातुन खुले आम वाळू चोरी होत असून प्रशासन चे उच्च अधिकारी यावर लक्ष का देत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे आज बाजारात वाळू चे भाव पेट्रोल पेक्षा कित्येक पटीने वाढले आहे पैनगंगा नदी आज सोन्याची खान झाली आहे पण या सोन्याचा उपयोग शासनाला होत नाही या शासन या सोन्याचा फायदा वाळू चोरांना वाटण्याची भूमिका निभावत आहे. माहूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना या वाळू तस्करांपासून सहा ते सात हजार रुपये ब्रास प्रमाणे वाळू घ्यावी लागत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. माहूर तालुक्यातील वाळू तस्करी संदर्भात नावाजलेल्या सायफळ वाळू घाटातून चोरटी वाहतूक करून साठवणूक केलेल्या वाळू चोरट्यांचे साठे सायफळ चे तलाठी यांनी धडक कारवाई करून जप्त केले आहे.माहूर तालुक्यात वाळू तस्करी संदर्भात गाजलेल्या पैनगंगा नदी काठी वसलेल्या सायफळ वाळू घाटातून दिवस रात्र वाळू उपसा सुरू होता. तलाठी दयानंद एरडलावार यांनी पैनगंगा नदी मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर खंदक खोदून नाली मारून रस्ता बंद केला होता.मात्र सायफळ येथील वाळू तस्करांनी गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळू साठे जमा करून ठेवले होते.आज दिनांक रोजी तलाठी दयानंद यरडलावार, व कोतवाल पवन पाटील यांनी धाडसी कारवाई करून अंदाजे 36 ब्रास वाळू जप्त केला आहे. हे वाळू साठे माळाच्या काठाला गायरान जमिनीवर सर्वे नंबर 91 मध्ये वाळू तस्करांनी साठवणूक करून ठेवले होते माहूर तालुक्यात वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असताना महसूल प्रशासनातर्फे वाळू तस्करी थांबण्यावण्या करिता पथके नेमण्यात आली आहे. विशेषता सायफळ येथे पथके नेमण्यात आले आहे. सायफळ सज्याचे तलाठी दयानंद येरडलावार यांनी केलेल्या या धाडसी कारवाई मुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
