Top News

The main intersection of Datala village invites accidents.....

दाताळा गावातील मुख्य चौरस्ता देतो आहे अपघाताला निमंत्रण......


संबंधीत विभागाने तातडीने लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे - योगेश मुर्हेकर



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

दाताळा गावातील मुख्य चौकात मोठ मोठे खड्डे पडले असून  येथे रोज अपघात होत आहे. दिवसेंदिवस या मार्गावर वाहतूक वाढत चालली असून दिवसभर मोठमोठ्या वाहणाची वर्दळ सुरु असते. याच मार्गांवर समोर एम आय डी सी असल्यामुळे व नागपूर रोड व पडोली जाण्याकरिता तसेच घुघूस जाण्याकरिता हा शॉर्टकट मार्ग असल्यामुळे दिवसभर  या मार्गांवर वाहणाच्या रांगा लागलेल्या असतात.

 परंतु  येन दाताळा मार्गांवर क्रितेक वर्षा पासून चौकात मोठमोठे  खड्डे पडल्या मुळे येथे रोज अपघात होतात सायकील वाले दुचाकी वाले यांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्याने दळणवळण करावी लागते. दाताळा गावालागत  मोठमोठ्या स्कुल असल्यामुळे  मोठ्या प्रमाणात या रस्त्याने मुले स्कुल ला ये जा करतात, आटो रिक्षाने मोठया प्रमाणात मुले शाळेला जातात रस्तावरील खड्याची अवस्था पाहून मोठया प्रमाणात पालक भीतीच्या वातावरणात मुलांना या रस्त्याने शाळेत पाठवीत आहे. पाऊस आला की संपूर्ण चौकात पाणी भरून जाते व पाऊस थांबला की सर्वत्र चिखल व संपूर्ण खड्यात पाणि साचून राहते या मुळे रस्त्यात खड्डे आहे की नाही हे कळत नाही व त्यामुळे अपघात होतात चिखला मुळे वाहने स्लिप होऊन पडतात.

 सदर बाब पाहता सदर मार्गावरून रहदारी करणार्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे तर शासकीय कार्यालये झोपी गेलेली असून कुठल्याही शासकीय विभागाचे या कडे लक्ष नाही  व  pwd विभाग मुद्दाम या कडे कानाडोळा करून गप्प बसलेला आहे? असा आरोप रहदारी करणार्या नागरीकांनी केला आहे. तर स्थानीक आमदार फक्त गावातील कार्यक्रमाचे फिता कापायला व श्री फळ फोडायला येतात, जिल्ह्याचे पालकमंत्री कधीच या रस्त्याने फिरकून पाहत नसल्याच ही तेथील स्थानीकांच म्हणे आहे, जनता या रस्त्याने त्रस्त झाली परंतु कुणालाही जनतेच्या समस्ये कडे लक्ष द्यायला वेळ नाही? सर्व मोठया अपघाताची वाट पाहत आहे? की एखादा मोठा अपघात झाल्यावरच  यांचे लक्ष  या समस्से वर जाईल?

 युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष व विदर्भ राज्य अंदोलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष  योगेश मुरेकर यांनी वेळीवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला या समस्से बाबत निवेदने दिली, आंदोलने केली, फोन द्वारे माहिती करून दिली पण सार्वजनिक बांधकाम विभाग तात्पुरते माती टाकून जनतेची मन समजावणी करतात व निवेदनाला केळाची टोपली दाखवितात असा आरोफ योगेश मुर्हेकर यांनी केला आहे.

 आता तरी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी योगेश मुर्हेकर यांनी केली आहे.

Previous Post Next Post