विदर्भाच्या तरूनाने हिंदी चीत्रपट सृष्टीत उमटवला आपल्या अभीनयाचा ठसा......
विदर्भासह झरी तालुकाचे नाव केले रोषन.....सर्वत्र कौतुकांचा वर्षाव.......
सामान्य कुटुंबातीत युवकाने हालाकीच्या परीस्थीती गाठले यश.......
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील अडेगांव या छोट्याश्या गावचा अविनाश .याच वय २७ वर्ष.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्याचे वडील गोवर्धन चंदनकर शिवणकाम करून घर चालवतात.अविनाशला अभिनयाची बालपणापासून आवड आहे.अविनाश चंदनकर म्हणजे अष्टपैलु ,कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व. बालपणापासुनचं त्याला सर्वजण आपला सुपरस्टार म्हणुन ओळखतात.अविनाशलाअभिनयात,चित्रकलेत,कविता,कथा,गीत लिखाणात,गायनात बालपणापासुनचं प्रचंड आवड आहे आणि अजुनही तो कलेला जपतो.अविनाशने अनेक नाटके स्वतः लिहून बसवले आणि त्यात अभिनय केला. पल्याड या मराठी चित्रपटात पण तो सर्वांना दिसला.सद्या अविनाश नाट्यशास्त्र विषयात मास्टर करत आहे.
अभिनय क्षेत्रात अविनाशने पाऊल टाकलं असून धिराल एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत, राजू भारती निर्मित बेरा एक अघोरी हा हिंदी चित्रपट शुक्रवार २८ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला असून,
शक्तिवीर धिराल, प्रेम धिराल आणि प्राजक्ता शिंदे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. सहाय्यक अभिनेता म्हणून अविनाश चंदनकरने रॉकी नावाची सुंदर भूमिका साकारली आहे.या चित्रपटात बहुतांश कलावंत विदर्भातील आहेत.अविनाशचा अभिनय पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.भविष्यात अविनाशला चित्रपट क्षेत्रात अजुन खूप उंच भरारी घ्यायची आहे.
त्याच्या भावी वाटचलीसाठी अवीनाश ला गावातील नागरीकांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहे...अवीनाश ला पुढील वाटचालीस विदर्भ माझा न्युज 24 परीवारा तर्फे हार्दीक शुभेच्छा.....

