31 डिसेंबर 2023 पूर्वी विदर्भ राज्य मिळविणारच – ॲड. वामनराव चटप
विराआंसने महाराष्ट्र दिनाचा निषेध करून कोयला रोको आंदोलन केले यशस्वी....
उमरेड कोळसा खाणी समोर स्वतंत्र विदर्भा साठी हजारो विदर्भवादी कार्यकर्ते एकवटले.....
विदर्भ माझा न्युज 24 - उमरेड
विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंबलबजावणी काटेकोर पणे करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा या खनिजाचे उत्पादन थांबविण्याकरीता महाराष्ट्र दिनाचा निषेध करून उमरेड कोळसा खाणी समोर महामार्गांवर अडीच तास कोयला रोको आंदोलन करून दुपारी २ ते ४.३० या कालावधीत कोळसा खाणी मधून बाहेर जाणाऱ्या कोळश्यांचे ट्रक अडवून यशस्वी आंदोलन करून "शुरू हुई है, जंग हमारी", लढेंगे - जितेंगे, कटेंगे मगर हटेगे नही, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ, या घोषणानी व महाराष्ट्र दिनाचा निषेधाच्या घोषणानी परिसर दनानून सोडला.
विराआंसने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ११८ वर्षाच्या मागणीची लढाई ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने "करू किंवा मरू", जिंकू किंवा मरू नाहीतर कायम स्वरूपी जेल मध्ये सडू, यातर्हेने आंदोलनाची तीव्रता वाढवून आंदोलनाचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
हे आंदोलन यशस्वी करण्याकरीता, विराआस नेते ऍड. वामनराव चटप, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मत्ते, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, डॉ. दिलीप झलके, नरेश निमजे, रेखा निमजे, सुनीता येरणे,मजी मंत्री डॉ. रमेश कुमार गजबे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, कृष्णराव भोंगळे, दिलीप भोयर, राजेंद्र आगरकर, कपिल ईद्दे, मितीन भागवत, अरुण मुणघाटे, राजेंद्र सिंग ठाकूर, वसंत गवळी, सुदाम राठोड, घिसू खुणे पाटील, अतुल सतदेवे, ज्ञानचंद सहारे, अंकुश वाघमारे, रमेश नळे, प्रतिभा भोसले, अयुब शेख, मनीषा तिरपूडे, राहुल खारकर, राजेंद्र गजभिये, बंडू कामडी गुरुजी, शांताराम राऊत, कविता गजभिये, विलास कदम, प्यारूभाई, योगेश नंदनवार, पराग गुंडेवार, वीणा भोयर, सतीश दाणी, सचिन डाफे, रजनी शुक्ला, ज्योती खांडेकर, अशोक पाटील, वसंतराव वैद्य, अमूल साकुरे, हेमंत मरकाम, ऍड. मृणाल मोरे, प्रकाश लड्डा, सतीश प्रेमलवार, प्रीती दीडमुठे, रेखा चरडे, अर्चना उके, भारत मासुरकर, तारेश दुरुगकर, मोरेश्वर वनकर, गणेश शर्मा, अनिल केशरवानी, विजय मोंदेकर, राजेश काकडे, राजेंद्र सतई, हरीभाऊ पानबुडे,रोहीत लोनारे,संदीप केशकर,वैभव दुपारे सह विदर्भातील काणा कोपर्यातील असंख्य विदर्भावादी या आंदोलनात उपस्थित होते.
या आंदोलनाचे वैशिष्ट म्हणजे हजारोंच्या वर विदर्भावाद्याची उपस्थिती होती व पन्नास टक्क्यांन पेक्षा महिला व युवकांचा सहभाग होता, शेवटी स्वतंत्र विदर्भाची शपथ घेऊन पोलीस व आंदोलकांच्या रेटा रेटी नंतर आंदोलन संपले.
