राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे पाथरी येथील दोन मदतग्रस्तांना आर्थिक मदत......
विजय वडेट्टीवार हे जनतेचे कैवारी -अध्यक्ष,सावली तालुका काँग्रेस कमिटी
विदर्भ माझा न्युज 24 - सावली
तालुक्यातील पाथरी येथे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आली. जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा हे व्रत स्वीकारून माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार हे कॅन्सरग्रस्त,गरीब लोकांना आर्थिक मदत करतात.ते निस्वार्थ जनसेवेचे उत्तम उदाहरण आहेत.
सावली तालुक्यातील पाथरी येथे पाथरी येथे स्व.शाहू गुणाजी साखरे हे व्यक्ती रेल्वे अपघातामध्ये मरण पावले होते. सदर व्यक्ती कष्टाळू व घरातील कमवता होता घरची परिस्थिती हालाकीची आहे. तसेच पाथरी येथील सक्रिय काँग्रेस कार्यकर्ते सचिन शेंडे यांचा मुलगा कु.लक्ष सचिन शेंडे हा नऊ वर्षाचा मुलगा असून त्याला हाताला लखवा मारलेला होता त्याला नागपूर येथे पुढील उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ माजी मंत्री,व आमदार लोकनेते विजय वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत वरील लोकांना मिळवून दिली.
मदत देताना माजी काँग्रेस तालुका सावली तालुका काँग्रेसचे राजू सिद्धम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, तसेच डॉ.प्रमोद सोनवणे माजी उपसरपंच पाथरी, मोहित मेश्राम ग्राम काँग्रेस अध्यक्ष पाथरी,मुकेश मेश्राम सेवा सहकारी संस्था अध्यक्ष पाथरी,सचिन शेंडे युवा काँग्रेस कार्यकर्ते,अमित ठीकरे गाव तंटामुक्ती अध्यक्ष, पाथरीचे सोशल मीडिया प्रमुखरोशन ठीकरे प्रमुख कार्यकर्त्यासह आदी गावकरी उपस्थित होते.

