झरी बाजार समितीवर काँग्रेस चा एकतर्फी विजय.....
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
झरी तालुका बाजार समिती च्या काल झालेल्या निवडणूक व निकालात भाजप चा दारुण पराभव झाला काँग्रेस ने एकतर्फी बाजी मारून एकतर्फी 18 पैकी 18 जागा जिंकल्या..
काँग्रेस चे माजी आमदार वामन कासावार व शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने यश मिळवले.रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतर सायंकाळी मतमोजणी ना सुरवात झाली.. सुरवातीपासूनच काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली व 18पैकी 18 जागावर विजय मिळवला..विजयानंतर झरी येथील काँग्रेस पद अधिकाऱ्यांनी जल्लोष करून आनंद साजरा केला...

