Top News

District Superintendent Agriculture Officer direct inspection of young experimental farmer Sumit Samarth in the orchard....

जिल्हा अधीक्षक कृषि अधीकारी ह्यांची युवा प्रयोगशील शेतकरी सुमित समर्थ ह्यांचे फळबागेत प्रत्यक्ष पाहणी....



विदर्भ माझा न्युज 24 - मुल 


         मूल तालुक्यातील फिसकुटी – विरई येथील आधुनिक प्रयोगशील युवा शेतकरी सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांनी मुरमाळ व गोटाळ असलेल्या शेतीतील जागेत  पारंपरिक शेत पिकाला बाजूला सारून तालुक्यातला नवीन  प्रयोग  म्हणुन उत्कृष्ठरित्या आधुनिक  जर्मन टेक्नॉलाजी पद्धतीने मोठ्या स्वरूपात सव्वा बारा एकरात तालुका कृषि अधिकारी कार्यालय मूल ह्यांच्या मार्गदर्शनात  तब्बल ४५०० झाडांची लागवड करून नवयुवकात आदर्श निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला करिता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे , तालुका कृषि अधिकारी भास्कर गायकवाड ,  महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरासिया , कृषि सहाय्यक के .पी डोंगरे , कृषि पर्यवेक्षक राठोड सदर चमुनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 



      सदर फळबाग  मोठ्या प्रमाणात लागवडीत १००० आंबा झाडे ( जाती  :- केशर ,लंगडा ,दशेरी ,कलेक्टर ,बारमाही ,आम्रपाली ) सीताफळ ११०० ( जाती  :- NMK सुपरगोल्ड , सरस्वती ) चिकू ६०० (जाती :- फुटबॉल , कालिपत्ती ) फणस ५०० ( कापा ) पेरू ८०० (सरदार पिंक ) निंबू ५०० , नारड २५० मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली . 

    ह्याशिवाय प्रायोगिक तत्वावर शेवगा , ड्रगणफ्रूट , अननस , स्ट्राबेरी , अंजीर , स्टारफ्रूट ,लिची , अंगूर ,मोसंबी ,संत्र ,वॉटर अॅपल ,डाळिंब , आवळा , चेरी ,रामफळ ,खजूर  , काजू ह्या प्रकारे २९ प्रकारचे फलबाग  लागवड करून सदर प्रयोग यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहे ह्याशिवाय फलबागेच्या व्यतिरिक्त मच्छीपालन ,  नैसर्गिक  पद्धतीने गावठी कोंबडी पालन ,  साहिवाल गाय पालन , कंपोस्ट खत प्रोजेक्ट हयाप्रकारे  अनोख्या पद्धतीने शेतीला जोड धंदा व पूरक व्यवसाय म्हणुन प्रयत्न सुरू करणार  आहेत एकंदरीत सदर संपूर्ण प्रयोग २० एकरात असून भविष्यात मोठ्या स्वरूपात ग्रामीण संस्कृतिनि नटलेला आगळा – वेगळा  कृषि पर्यटन उभारण्याचा मानस असल्याचा सुमीत समर्थ ह्यांनी जिल्हा कृषि अधीक्षक व चमू ह्यांना भेटी दरम्यान सांगितले .

      सदर लागवडीत १०० टक्के रोपे जगवलेली ,  बाग एकदम हिरवीगार व  अपेक्षेपेक्षा कमी वेळात योग्य वाढ , योग्य खत पानी व्यवस्थापन  तसेच  संपूर्ण शेत  तणविरहीत बघून जिल्हा कृषि अधीक्षक ह्यांनी सदर बाग फुलवणारे सुमीत समर्थ ह्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन जिल्हा व तालुका कृषि विभागाकडून  जमेल तेवढे मार्गदर्शन व सहकार्य लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले . जेणेकरून जास्तीत - जास्त युवा वर्ग शेतीकडे वळून शेत व्यवसायात बळकटी येईल.

Previous Post Next Post