आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून सावली येथील चिमुकल्या मुलीला आर्थिक मदत......
आमदार.विजय वडेट्टीवार, यांचे मनापासून आभार, ते देवदूता सारखे संकटावेळी धावून आलेत, त्यांनी दिलेली मदत मी सदैव आठवण ठेवणार - लोकनाथ भडके, त्या चिमुकल्या मुलीचे आजोबा
विदर्भ माझा न्युज 24 - सावली
सावली शहरातील वॉर्ड क्र.१७ येथील शुभम लोकनाथ भडके यांची मुलगी कु.अनन्या शुभम भडके ही चिमुकली अगदी १८ महिन्याची असून तिला विनोबा भावे, सावंगी दत्ता मेघे हॉस्पिटल ,वर्धा येथे भरती केले असता डॉक्टरांनी सदर मुलीला नवीन हृदय बसव्हावे लागेल असे सांगितले.त्यामुळे भडके कुटुंबीयांना धक्काचं बसला, मुलीचे वडील खूप गरीब घरचे असून घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची आहे. हृदय बसविण्यासाठी तिच्या उपचारासाठी 50 लाख रुपयांचा खर्च आहे.
या घटनेमुळे सावली शहरात हळहळ सुरु झाली, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी, सदर घटनेचे गांभीर्य समजून राज्याचे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांना तात्काळ संपर्क करून कु.अनन्या शुभम भडके ह्या चिमुकल्या मुलीचा पुढील उपचारासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत पाठवली.सदर मदत सावली नं.प.च्या नगराध्यक्षा लता लाकडे यांनी त्या चिमुकलीचे आजोबा लोकनाथ भडके यांना प्रदान केली.
यावेळी त्यांनी आमदार विजय वडेट्टीवार, यांचे मनापासून आभार व्यक्त करतांना भडके कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते," वडेट्टीवार देवदूता सारखे संकटावेळी धावून आलेत, त्यांनी दिलेली मदत मी सदैव आठवण ठेवणार" असे प्रतिपादन लोकनाथ भडके यांनी केले. यावेळी नगरसेविका अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडावार, नगरसेवक प्रितम गेडाम,काँग्रेस कार्यकर्त्या अंजली दमके, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कमलेश गेडाम, तसेच कुणाल गेडाम आदी उपस्थित होते.
