नौकरी वर घ्या नाहीतर पेंशन द्या......
विन विकास महामंडळ ब्रह्मपुरी येथील सेवेतून कमी केलेल्या कर्मचार्यांचा गेल्या १२ वषांपासुन संघर्ष....
१५ दिवसांत तोडगा काढा अन्यथा जिल्हाधीकारी कार्यालया समोर आमरण उपोषन करू...सुरज ठाकरे यांचा इशारा......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
वनवीकास महामंडळाच्या ब्रम्हपुरी प्रकल्पात बारमाही कामगार म्हणून १२ वर्षे सेवा दिल्यानंतर ९९ कामगारांना काढून टाकले या पैकी ३० कामगारांना सेवेत परत घेण्यास व भविष्य निर्वाह निधी मिळण्यासाठी संबंधीत विभागामध्ये तथा वनमांत्र्यांच्या देखील दरबारी न्याय मानगिला. परंतु वनमंत्र्याच्या पत्राची दखल अद्याप संबंधीत विभागाने घेतली नसल्याने ३० कामगारांना अद्याप न्याय मीळालेला नाही. त्या मुळे येत्या १५ दिवसांत या विषयी तोडगा न काढल्यास जिल्हाधीकिरी यांच्या कार्यालया समोर आमरन उपोषण करण्याचा इशारा युवा स्वाभीमाण पार्टीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये आयोजीत पत्रपरीषदेत दीला.
वन कामगार विनवकास महामंडळ ब्रह्मपुरी (एफ डी सी एम) वन प्रकल्प वीभाग येथे सन १९८८-८९ या कालावधीमध्ये बारमाही कामगार कामावर रूझू झाले होते.
बारा वषे प्रामाणीकपणे सेवा दीली अस्ता देखील सन २००० मध्ये कामगारांना काम संपुष्टात आल्याचे कारण सांगून एकून ९९ कामगारांना कामावरून काढले गेले. यातील ३० कामगार सातत्याने परत कामावर सामावून घेण्याकरीता तथा त्यांना भवीष्य निर्वाह निधी मीळवीन्याकरीता संबंधीत विभागामध्ये तथा वनमंत्र्यांचा देखील दरबारी न्याय मानगिला अस्ता आपण वनमंत्री अस्तांना अनेकदा आपल्या कार्यालयातुन पत्रव्यवहार संबंधित वीभागांमध्ये केला गेला असतांना देखील आपल्या पत्राची दखल अद्याप संबंधीत विभागाने घेतली नसल्याने ३० कामगारांना अद्याप न्याय मीळालेला नाही.
सदर प्रकरण प्रलंबीत ठेवण्यामागचे एकमेव कारण म्हणजे, जन माहीती अधिकारा अंतर्गत प्राप्त झालेल्या माहीती नुसार कर्मचारी भवीष्य निधी संघटन ते १० वर्ष सेवा दीली असल्यास त्यांना पेंशन योजना लागू असल्याची माहीती प्राप्त झाली. असे असतांना देखील सदर कामगार १२ वषे सेवा देऊन देखील त्यांना नियमाप्रमाणे अद्याप पेंशन लागू झाली नाही.
संबंधित वीभागाने या समस्त कामगारांना भवीष्य निर्वाहन निधी न मीळावे या हेतुने विनवीकास महा मंडळ वन प्रकल्प ब्रह्मपुरी येथील कार्यालयाने जो अहवाल सादर केला त्यात कामगारांनी बारा वषे सेवा दिली असल्याची माहीती जन माहीती
अधीकारा अंतर्गत प्राप्त झाली असून बारा वर्षाची माहीती देणारे कार्यालय सदर कामगार बारा वर्षे कामावर नाही असे वक्तव्य करीत असून कामगार फक्त अडीच वर्षच आमच्याकडे आहे अशा स्वरूपाचे पत्र वनवीभाग यांनी काढले आहे. कार्यालयीन पत्राद्वारे सादर केलेला अहवाल हा शंकास्पद असून त्याची सखोल चौकशी तथा सहानिशा करून परत नव्याने अहवाल बनवन्यात यावा अशी विनंती एका पत्रा व्दारे जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा स्वाभीमान पार्टीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केली आहे.
सदर प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यानंतर कामगारांच्या बाजुने निकाल लागल्या नंतर न्यायालयाच्या निकालाच्या आदेश पत्रा नुसार कामगारांना काम केलेल्या कालावधी मधील जे काही उर्वरीत रक्कम विन वीकास महामंडळाकडे बाकी होती ती रक्कम प्रत्येकी कामगारांना २ लक्ष रु. प्रमाणे नमळाली. परंतु न्यायालयाच्या ऑर्डर कॉपी मध्ये भवीष्यामध्ये सदर काम सुरू झाल्यास काढलेल्या कामगारांना कामावर सामावून घ्यायचे नाही असा कुठल्याही प्रकारचा आदेश नाही तरी देखील त्यानंतर वन वीकास महामंडळाला मीळालेल्या कामांमध्ये काढलेल्या कामगारांना परत सामावून घेतले नाही. बेरोजगार झालेले कामगार काम मागण्याकरीता त्यांच्याकडे गेले अस्ता वन वीकास महामंडळ येथील कर्मचार्यांनी कामगारांना सांनगितले की तुम्ही २ लाख रुपये घेऊन तुमचा हीशोब क्लिअर केला,
आता आम्ही तुम्हाला कामावर सामावून घेणार नाही. असे सांगूि त्यांनी त्यांना आज पर्यंत कामावर सामावून घेतले नाही, असे देखील सुरज ठाकरे यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
या संदर्भात दिनांक - ९/ फेब्रुवारी/२०१९ रोजी महाराष्ट्रराज्य विन वीकास महामंडळ कर्मचारी संघटना (रजि. का. ऊ आ/ एन जी पी / ५३०४/२०१४) यांनी २०१९ मध्ये झालेल्या अधीवेशना मध्ये एकूण ३१ मुद्दे पारीत केले होते त्यातील मुद्दा क्रमांक २७ व ३१ आिही कामगारांचा प्रश्न प्रलंबीत आहे.
सदस्यतीत काढलेल्या काही कामगारांची वयोमर्यादा नियमानुसार जास्त झाली असल्याने त्यांच्या ठीकाणी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वन वीभागाने कामावर सामावून घेण्यात यावे व माहीती अधीकारा अंतर्गत जो बारा वर्षाचा मस्टर त्यांनी दिला तर सदर कामगार बारा वर्षे त्यांच्याकडे कामावर रुजु हे सत्य मान्य करून कामगारांना न्याय मळवून द्यावा अशी विनंती शजा मागनी युवा स्वाभीमान पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एका पत्रा व्दारे केली.
येत्या १५ दीवसांमध्ये न्याय न मीळाल्यास जिल्हाधीकारी कार्यालय चंद्रपूर समोर समस्त बेरोजगार कर्मचारी आमरण उपोषणास बस्तील याची दक्षता घ्यावी अस ही ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
