Top News

If the animals of the farmers go into the forest, then the forest department files a case against them, then when the animal of the forest department (tiger) kills farmers, farm laborers, villagers, file a case against the forest department as well - Farmer Farm Laborer Elgar Parishad

शेतकऱ्यांची जनावर जंगलात गेली तर त्यांच्यावर वनविभाग गुन्हे दाखल करतो मग वनविभगाचे जनावर (वाघ) शेतकरी शेतमजूर, गावकऱ्यांची हत्या करते तेव्हा वनविभागा वर सुध्दा गुन्हे दाखल करा -  शेतकरी शेतमजुर एल्गार परीषद



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)


      शेतकरी शेतमजुर एल्गार परिषदेच्या वतीने आज दिनांक 22/5/2023  रोजी  जिल्हाधिकारी  चंद्रपूर यांना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन सादर केले असून चंद्रपूर जिल्ह्याती राष्ट्रीय अभयारण्याला लागून असणाऱ्या गावांमध्ये वाघांचा प्रचंड धुमाकूळ आहे व वाघांच्या या धुमाकूळा मुळे प्रत्येक गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

 ह्या महिना पासून शेतीचे काम सुरू होत असून शेतकरी शेतमजुरांना शेतामध्ये जाणे आता कठीण झालेले आहे. शेतकरी शेतमजूर अतिशय दहशतीच्या वातावरणामध्ये शेती करण्यासाठी जात आहे .आतापर्यंत वाघाने शेकडो  लोकांचे बळी घेतले असून त्यांना अल्पशा नुकसान भरपाई देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेने केला आहे.

आता वाघाच्या हलल्यात बळी पडलेल्या व्यतीच्या कुटुंबाला 1 कोटी रू. व कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत समाविष्ट करावे. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला 25 लाख रु. नुकसान भरपाई द्यावी .अजूनही वाघांच्या माध्यमातून माणसांच्या हत्याकांडाचे सत्र  सातत्याने सुरू आहे. तेव्हा ते त्वरित थांबवावे, शेतकऱ्यांची जनावर जंगलात गेले तर त्याच्यावर वनविभाग गुन्हे दाखल करतात मग वनविभगाचे जनावर (वाघ) शेतकरी शेतमजूर, गावकऱ्यांची हत्या करते तेव्हा वनविभागा वर सुध्दा गुन्हे दाखल करावे.

 अशी विनंती करण्यासाठी शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष  ॲड.  राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष नाना आदे,अमोल गुरूनुले ,तालुकाध्यक्ष नंदू बारस्कर ,माळी युवा ब्रिगेडचे अध्यक्ष ओमदेव  मोहूरले,वर्षा लोणबले, उषा शेंडे ,रजनी  राजेंद्र मांदाडे, गुलाब शेंडे ,सत्यनारायण सोनुले, मारुती शेंडे, वासुदेवराव गुरनुले, विलास गुरनुले, हर्षाना महाडोळे,सुभाष सोनुले,नरेंद्र चौधरी,जिजाबाई मोहरले , माया शेंडे,राजू मोहरले, वसंत चहारे, सुरेश कावळे,गुलशन गुरनुले सह असंख्य पदाधीकारी व‌ कार्यकर्ते उपस्थीत होते.

Previous Post Next Post