Top News

Complete the lengthy process after Teacher Eligibility Test as soon as possible.....Eligible students' statement to Collector......

शिक्षक अभियोग्यता परीक्षे नंतरची लांबलेली प्रक्रिमा लवकरात लवकर पूर्ण करा.....अभियोग्यता धारक विद्यार्थांचे जिल्हाधीकार्यांना निवेदन......


          शिक्षक अभियोग्यता परीक्षे नंतरची लांबलेली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून 55 हजार शिक्षक भरती एकाच टप्प्यामध्ये करणेबाबत, तसेच शालेय संच मान्यता आहे. आधार कार्ड नुसार न देता सन 2022 व 2023 या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार देण्याबाबत चे निवेदन आज अमियोग्यता धारक विद्यार्थांनी जिल्हाधीकारी चंद्रपूर यांना केले आहे.



 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 

 शिक्षण मंत्री  यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात शिक्षक भरती संदर्भात यांची 80 टक्के शिक्षक भरती ही तात्काळ करणार असे सांगितले होते.

त्यानुसार शिक्षक भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 घेण्यात आली व निकाल घोषित होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होऊन शिक्षक भरती संदर्भात पुढील प्रक्रिया सुरू झालेली नाही.

या कारणास्तव डीएड व बीएड अभियोग्यता धारक विद्यार्थी नैराश्यामध्ये जात आहे तरी या उच्चशिक्षित बेरोजगारांना उमेदवाराकडून खालील मागण्यासाठी जिल्हाधीकारी चंद्रपुर यांना  सविनयपूर्वक निवेदन देण्यात आले.


अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांचे मागण्या खालील प्रमाने........


१). शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 अंतर्गत एकाच टप्प्यात 55 हजार शिक्षक यांची भरती करून अभियोग्यता धारकास न्याय द्यावा. 

२) पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.

३) निवड यादी सोबतच प्रतीक्षा यादी देखील लावण्यात यावी.

४) पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊन नोकरी मिळालेल्या उमेदवारास पुन्हा पवित्र पोर्टलवर प्रधान्यक्रम नोंदणी करण्यास संधी देऊ नये.

५) केंद्रीय पद्धतीने राबविण्यात यावी. तथा विभागीय पद्धतीने रविण्यात येऊ नये.

६) 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची निवृत्ती न करता त्या ठिकाणी ते 2023 मधील अभियोग्यताधारक  मधील अभियोग्यताधारक यांची निवृत्ती करण्यात यावी.

७)  दिवस पाळीतील शिक्षकांनाच रात्री पाळीच्या शाळेत नेमणूक देऊन दोन पगार देण्याऐवजी दोन्ही पाळीच्या शाळेत स्वातंत्र्य शिक्षकाची नेमणूक म्हणजे अभियोग्यताधारक कांची नेमणूक करावी

८) संच मान्यता करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक आधारित करू नये कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

९) २०१७ च्या शिक्षक भरती १९६ संस्थांच्या मुलाखती  लवकरात लवकर घेऊन भरती प्रक्रिया पूर्ण करावी 

१०) MAHATET बोगस प्रमाणपत्र धारक भरती प्रक्रियेत संधी देण्यात येऊ नये जरी त्यांनी CTET पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल. 

    अश्या मागनीचे निवेदन जिल्हाधीकारी चंद्रपूर यांना देण्यात आले. सदर निवेदन देतांना असंख्य अभियोग्यता धारक विद्यार्थी उपस्थीत होते.

Previous Post Next Post