Top News

Auto driver stoned to death in Nagpur

नागपुरात ऑटो चालकाची दगडाने ठेचुन हत्या.......




 विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर  

राजकुमार यादव हे ऑटोचालक आहेत. ते रात्रीच्या वेळी सीताबर्डी परिसरात ऑटो चालवतात. नेहमीप्रमाणे हे ऑटो घेऊन घरून गेले. पण, पहाटे घरी परतलेच नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. राजकुमार घरी का आले नसावेत, याची घरच्यांना चिंता लागली. तेवढ्यात त्यांना दुःखद घटना कळली. आता राजकुमार घरी परत येणार नव्हते. या बातमीने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. सकाळी राजकुमार यांचा मृतदेह दिसून आला. त्यांची दगडाने ठेचून हत्या केली होती.

नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका ऑटो चालकाची हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास गुजरात हॉटेलसमोर एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. एका अज्ञात आरोपीने डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

राजकुमार यादव असे मृत ऑटो चालकाचे नाव (वय 50 वर्षे) आहे. सीताबर्डी येथील हनुमान गल्लीच्या गुजरात हॉटेलच्या जवळ ही घटना घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

नागपूरचा सीताबर्डी परिसर हा नेहमी गजबजलेला परिसर असतो. हे मोठं मार्केट असून या ठिकाणी गर्दी असते. मात्र याच मार्केट परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली. दिवस उजाडताच या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतक हा ऑटो चालक असल्याचं पुढे येत आहे. तो रात्रीच्या वेळी ऑटो चालवायचा. मात्र याची हत्या कोणी आणि का केली याचा शोध आता पोलीस येत आहे. अशी माहिती डीसीपी राहुल मदने यांनी दिली.

सीताबर्डीसारख्या मार्केट एरियामध्ये ही हत्या झाली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. पोलीस वेगवेगळ्या मार्गाने आरोपीचा शोध घेत आहेत.

Previous Post Next Post