Top News

State level school wrestling tournament Sardar Patel Junior College Athletes awarded Survan Medal.......

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालयीन खेळाडूंना सुर्वण पदक.......




 विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड) 

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने नुकताच तालुका क्रीडा संकुल मूल जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या शालेय महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथील वृषभ विनोद चहारे याने ६० किलो वजन गटात ग्रीको रोमन स्टाईल मध्ये नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करीत सुवर्ण पदक प्राप्त केला. तसेच परिमल वतन राऊत याने ५७ किलो वजन गटात फ्री स्टाईल मध्ये नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करीत कास्य पदक प्राप्त केला. या विजयामुळे पदक प्राप्त खेळाडुंचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. सदर खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा .विक्की तुळशीराम पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले.

पदक प्राप्त खेळाडू मुल येथे आपल्या खेळाचे प्रदर्शन करून चंद्रपूर येथे आपल्या महाविद्यालयात परतल्यानंतर खेळाडूच्या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा  सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्षन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत व  सदस्य राकेश पटेल, सगुणा तलांडी व  एस. रमजान,  सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. पी. एम.  काटकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रदेव जे. खैरवार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विक्की तुळशीराम पेटकर व महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुध्दा खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले. 

 

 

 


Previous Post Next Post