Top News

Balharshah city shook by hand.....The young woman tied her hands and feet and killed her aunt by slitting her throat.

हत्तेने हादर्ले बल्हारशाह शहर.....


हात पाय बांधुन सख्या मावश्याची तरूनीने केली गळा चीरून हत्या.....



मालमत्तेच्या वादातून हत्या... उच्च शिक्षित तरुणी अटकेत....



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

कौटुंबिक वादातुश उच्चशिक्षित तरुणीने आपल्या मावशीच्या नवऱ्याची गळा चिरडुन निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बल्हारशाह शहरातील दादाभाई नौरोजी वार्ड येथे घडली. घटनेनंतर स्वतः आरोपी युवतीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. विशाल काशिनाथ दासरवार, वय 46 वर्ष असे मृतक व्यक्तीचे नाव असून शिवानी अजय बोधनवार वय 24 वर्ष असे आरोपी तरुणीचे नाव आहे.

सासर्याच्या निधना नंतर मालमत्ते (property) वरून विवाद होऊन मुली ने आपल्या मावश्याला हात पाय बांधून गळा कापूर हत्या केल्याची  खडळबळजनक घटना उघडकीस आली आहे.  

सवीस्तर वृत्त असे आहे की, बल्हारशाह शहरातील टेकडी विभागातील न्यू कॉलनी रोड महाराणा प्रताप वॉर्ड दुर्गा माता मंदीर जवळ स्वर्गीय शामराव कोडूरवार यांचा मृत्यू नंतर घराचा मालमत्ते (property) करिता नेहमी वाद होत होता. स्वर्गीय शामराव यांना मुलगा नसल्यानें तीन मुली आहेत त्यात दुसऱ्या नंबर चा जावई  विशाल दासरवार वय 43 वर्ष हा नेहमी मालमत्ते (property) करीता सासु व‌ नातेवाईकांन सह वाद घालायचा, 21 एप्रिल ला रात्री नेहमी प्रमाने वाद झाला,

त्यात रात्री 2 वाजताच्या सुमारात  विशाल दासरवार हे गाळ झोपेत असतांशा याचे हात पाय बांधुन विशाल याच्या पत्नीची बहीन लेक आरोपी नामे शीवानी अजय बोधनवार वय 24 वर्ष हिने ब्लेड ने गळा  कापुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटनेची  माहीती परीसरात पसरताच शहरात एकच खळबळ उडाली आहे‌.

सदर हत्या प्रकरणाची माहीती बल्हारशाह पोलिसांना देण्यात आली असून  हत्येनंतर बल्हारशाह पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तपासाला गती देत या प्रकरनातं MBA करणाऱ्या कुटुंबातील एका उच्च शिक्षित युवतीला ताब्यात घेतले असून सदर युवतीने विशाल ची हत्या केल्याचे कबूल केले आहे. 

घटना स्थळी पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेहसी, अतिरीक्त  पोलिस अधीक्षक  रीना जनबंधु, उपवीभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांनी घटना स्थळी भेट दिली, तसेच यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्याक  पोलिस निरीक्षक  रमेश हत्तीगोटे करीत आहे.

Previous Post Next Post