Top News

The accused who robbed a businessman from Wardha were taken into custody by the Ramnagar police in just 6 hours.

वर्धा येथील व्यावसायिकाला लुटनार्या आरोपींना रामनगर पोलिसांनी अवघ्या ६ तासात घेतले ताब्यात.......


 विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपुर (चांदागड) 

वर्धा येथील मार्केटिंगचे व्यावसायिक चिमूर येथून डी एन आर ट्रॅव्हल्स ने मार्केटिंगचे सामान पुरवण्याकरिता चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात रात्रो अंदाजे 9 वाजता मोबाईलवर बोलत जात असताना देवळीकर हॉस्पिटल समोर ऍक्टिवा मोटरसायकल ने दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल बडजबरीने हिसकावून पळ काढला अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशन येथे सुधीर देवराव गजरे यांनी दि. 13 जानेवारी 2023 रोजी दाखल केली.रामनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 37/23 कलम 392 34 भांदवी प्रमाणे गुन्हा नोंद करून्यात आला गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आपली सुत्र हलवीत तपास वेगाने सुरु केला.

घटनेचे गांभीर्य बघता पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे, पोऊनी विनोद भुरले तसेच गुन्हे शोध पथकातील सर्व कर्मचारी यांनी अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपी चेतन विनोद मांढरे वय 20 वर्ष राहणार नेहरु शाळेजवळ चंद्रपूर, आकाश गणेश दिकोंडवार व 21 वर्ष राहणार घुटकाला, तुकडोजी पुतळ्यामागे चंद्रपूर यांना अटक करण्यात आली असून बळजबरीने हिसकावलेले एकूण 3 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा मोपेड, जुना वापरता पांढऱ्या रंगाचा जॅकेट असा एकूण 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनी हर्षल एकरे, पोउनी विनोद भुरले तसेच गुन्हे शोध पथक रामनगर येथील सर्व कर्मचाऱ्यांनी केली.


Previous Post Next Post