बल्हारशाह येथील रेल्वे चौक परीसरात भिषण अपघात...एका व्यक्तीचा घटना स्थळिच मृत्यू.......
बल्हारशाह शहरातील वाहतुक विभागाच्या कार्यप्रनालिवर प्रश्न चीन्ह......
शहरातील नगर परिषद चौकातील वाहतुक सीग्नल मागिल काही वर्षा पासून बंद.......
वाहतुक व्येवस्थे कडे लक्ष देण्याची गरज......नागरीकांची मागनी.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहर औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर म्हणुन ओळखले जाते त्यामूळे राज्यमहामार्गावर सतत वर्दळ असते अनेक लहान सहान अपघात यापूर्वी घडले आहे.
मात्र दि.29/1/2023 रोजी दुपारी 1:00 च्या सुमारास बल्हारशाह शहरातील रेल्वे चौक परिसरात एका 16 चाकी ट्रकने एका पादचारी व्यक्तीस चीरडल्याने परीसरात तनावाचे वातावरन निर्माण झाले.
सवीस्तर वृत्त असे आहे की, मोहम्मद फारूख अब्दुल गफ्फार वय - 70 वर्षे, रा. संत कबीर वॉर्ड हिंगणघाट येथील रहिवासी असून काही कामासाठी बल्हारशाह येथे आले असतांना रेल्वे चौक परिसरात रस्ता ओलांडतांना चंद्रपूर वरुन आलापल्ली जाणाऱ्या ट्रक क्र. MH 34 AJ 3596 ने त्यांना चिरडले असून त्या व्यक्तीचा घटना स्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेने परिसरात काही वेळ चांगलाच तणाव निर्माण झाला.
या अपघाताची माहीती पोलिसांना कळताच उमेश पाटील, पोलिस निरिक्षक बल्हारशाह, विकास गायकवाड सहाय्यक पोलिस निरिक्षक बल्हारशाह यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालय बल्हारशाह येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास बल्हारशाह पोलिस करत आहे.
ट्राफीक विभागाच्या कार्यप्रनालीवर प्रश्न चीन्ह.......
बल्हारशाह शहरात अनेक छोटे मोठे अपघात नेहमीच होत राहतात, अनेकांना अपघातात आपला जिव गमवावा लागतो, बालाजी काॅंम्प्लेक्स ते जुना बस स्थान परीसर या भागात नेहमीच रहदारी जास्त अस्ते.
दारू सुरू झाल्या पासुन जुनाबस स्थानक परीसरात रहदारी अत्यंत असते त्यात जुना बस स्थानक परीसरातील देशी दारु चे दुकान व बियर बार यांना परकींग नसल्याने वाहन रोड वरच उभे असतात, त्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र शहरातील ट्राफीक विभागाचे या कडे पुरेपुर दुर्लक्ष दिसत आहे, शहरातील नगर परीषद चौक समोर सुरु करण्यात आलेला ट्राफीक सिग्न सुद्धा गेल्या काही वर्षा पासुन बंदच आहे. बस स्थानक परीसर सोडला तर न.प. चौक,रेल्वे चौक,जुना बस स्थानक परीसरात ट्राफीक कर्मचारी दिसत सुद्धा नाही.
तरी ट्राफीक व्यवस्था सुधारण्याची अत्यंत गरज असल्याची आता नागरीकांन मध्ये या अपघाता नंतर चर्चा रंगली आहे.

