Top News

On behalf of Nagvansh Youth Force at Rajura, Eng. Anant Raut's Poetic Enlightenment Program...

राजुरा येथे नागवंश युथ फोर्स च्या वतीने इंजि. अनंत राऊत यांच्या काव्यमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन......



 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


 नागवंश युथ फोर्स राजुरा च्या वतीने इंजि. अनंत राऊत यांच्या काव्यमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन आज 1 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे करण्यात आले आहे. 

"दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गरव्यासारखा" या गीतासह आपल्या विनोदी व मिश्किल स्वभावाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयास अलगद स्पर्श करून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा तडफदार कवी, गझलकार तथा स्पष्ट, प्रखर मात्र समाजाच्या तळागळातील ज्वलंत समस्यांवर संवेदनशील प्रहार करणारे प्रबोधनकार इंजि. अनंत राऊत यांच्या 'काव्यमय प्रबोधन संध्या' कार्यक्रम पार पडणार आहे.

सदर काव्यमय प्रबोधन संध्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) भूषण फुसे, सहउदघाटक अ.भा. भ.वि. जाती वेलफवर संघ चंद्रपूर प्रदेशाध्यक्ष आनंदराव अंगलवार, अध्यक्षस्थानी प्रवृत्ती फाऊंडेशन राजुरा अध्यक्ष आशिष करमनकर, विशेष अतिथी म्हणून जि.म.सह. बँक चंद्रपूर संचालक पांडुरंग जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर डॉ. बंडू रामटेके, बालरोग तज्ञ राजुरा डॉ. संदीप बांबोळे, नेत्र रोग तज्ञ चंद्रपूर डॉ. चेतन खुटेमाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा सुरेश येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनकरण चंद्रपूर गजानन इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विरुर (स्टे.) देवराव पवार, पोलिस ठाणे विरुर (स्टे.) ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांची उपस्थिती राहील.

आयोजित 'काव्यमय प्रबोधन संध्या' कार्यक्रमास राजुरा शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती नागवंश युथ फोर्स व कार्यक्रमाचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी केली आहे.

Previous Post Next Post