कळमनावाशीयांनी बैलबंडी व श्रमदानातून तयार केला रस्ता.
सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या उपक्रमांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
कळमना हे गाव आणि येथील उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा घेऊन काही अभिनव असे उपक्रम गावात राबविण्यात अग्रेसर असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. याही वेळी कळमनाचे सरपंच तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमना येथे श्रमदान करण्याचा मानस गावकऱ्यांना बोलून दाखविला गावातील रस्त्याच्या दुतर्फे बंदिस्त केलेल्या गटाराच्या बाजूला सकल जागेमध्ये रेती मुरूम भरून गावातील दुतर्फा रस्ता चांगला करण्याकरता गावातील नागरिकांनी बैलबांडीच्या माध्यमातून सगळा रस्ता चांगला केला. सरपंच वाढई हे स्वतः सगळ्या सार्वजनिक उपक्रमामध्ये हिऱ्याहिरीने सहभाग घेऊन लोकसभागातून कळमना हे गाव स्वच्छ, सुंदर व हिरवेगार, पर्यावरण पूरक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.
कळमना येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी, सुजन नागरिक यांना या चळवळीमध्ये सहभागी करून कळमना हे गाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदर्श करण्याच्या दृष्टिकोनातून ते काम करीत आहेत.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तूजी पिंपळशेडे, गुरुदेव सेवा मंडळाचे चे ज्येष्ठ अनुयायी पुंडलिक पाटील पिंगे, कवडू पाटील पिंगे, गुरुदेव सेवा भजन मंडळाचे मधुकर थीपे, अनिल बोडाले, गजानन गोरकर, आनंदराव वांढरे, सोमाजी नागोसे, शामराव अटकारे, अविनाश निमकर, कवडू मुठलकर, प्रभाकर पिंगे, गोसाई उमाटे, काशिनाथ सिडाम, पुंडलिक मेश्राम, विनोद चौधरी, देवराव ताजने, रामचंद्र गौरकर, संदीप गिरसावळे, मारुती अटकारे, राजेश गिरसावळे, अतुल अटकारे, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह समस्त नागरिक उपस्थित होते.

