सिद्धार्थ पथाडे यांची आर पी आय आठवले गटाच्या विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती : मान्यवरांनी केला सत्कार.
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
अनेक अडचणी असतानाही स्वतःशी प्रामाणिक राहणे, वैचारिक संपत्ती असूनही साधे राहणे, राग असूनही शांत राहणे, अधिकार असूनही नम्र राहणे यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. हे जो साध्य करतो तो यशाच्या शिखरावर पोहोचतो कठीण प्रसंगाला तोंड देत स्वतःची यशोगाथा सिद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आंबेडकरी चळवळीचे बिनीचे शिलेदार व रिपाई आठवले गट चे नेते आयुष्यमान सिद्धार्थ आस्तिक पथाडे संकट आणि संघर्ष माणसाला बलवान बनवतात या विचाराला सार्थक ठरवत सिद्धार्थ पथाडे यांनी आयुष्याला सुरुवात केली. एका खेड्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन कुठलीही राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी नसताना ही स्वबळावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रासोबतच सहकार चळवळीच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले.
ज्या समुदायाला शिक्षणाची बंदी होती त्या समाजातील वंचित पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आदिवासी व दुर्गम भागात शाळा सुरू करून शिक्षणाची दारे उघडी केली. अशा कर्तुत्वान व्यक्तीचा सत्कार करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना भोई-ढिवर समाज संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भोयर, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ विभागीय महासचिव तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, गोंडवाना चळवळीचे अभ्यासक तथा पाचगाव ग्रामपंचायतचे सदस्य बापूराव मडावी, रिपाई चे कार्यकर्ते विकास आलोने, राजू चेन्ने, महेंद्र साखरकर यांनी सिद्धार्थ पथाडे यांचे घरी जाऊन भेट घेतली व त्यांची विदर्भ उपाध्यक्ष आर पी आय आठवले गट पदी नियुक्ती झाली. त्यांच्या या संघर्षमय यशाच्या भरारी बद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

