Top News

A married woman committed suicide by jumping into a well. Maher's relatives allege that there was an accident...

विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या......


घातपात झाल्याचा माहेरचा नातेवाईकांचा आरोप......



 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 


पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील मौजा सुभाषनगर येथील विवाहित महिला सौ.जोक्षना किशोर राठोड वय २५ रा.सुभाषनगर ता.आर्णी या विवाहित महिलेने घरगुती वादातून शुक्रवारी दुपारी १२ वाजता विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली,सदर महिला दिनांक २७ जानेवारी रोजी घरून शेतात जातो म्हणून घरून रागाने निघून गेली, संध्याकाळी घरी परत न आल्याने गावातील नातेवाईकांनी,जोक्षना चा शोधा-शोधा सुरू केला,दिवसभर व रात्रभर शोध घेऊन सुद्धा जोक्षना सापडली नसल्याने,नातेवाईकांनी परीसरातील सर्व शेत शिवारातील सगळ्या विहिरी शोधून काढले असता, शेवटी संशयाची सुई एका विहिरीवर येऊन थांबली, त्या विहिरी भोवताल काही न सापडल्याने सगळे संध्याकाळी आपापल्या घरी गेलेत, दुसऱ्या दिवशी सकाळी अजून शोध सुरू केले असता, परिसरातील जाणाऱ्या रस्त्यावरील एका विहिरीमध्ये विवाहित महिला जोक्षना चा शव पाण्यामध्ये तरंगताना दिसले, गावातील पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशन परवा येथे फोन करून घटनेची सविस्तर माहिती दिली असता, पारवा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी शव पाण्याबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे,कालपासून मृतक महिलेचा पती किशोर हा बेपत्ता असून,त्याचा फोन बंद दाखवत होता,सदर घटनेबाबत मृतक जोक्षना राठोड हिचे काका ज्ञानेश्वर जाधव साखरातांडा यांनी पारवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

Previous Post Next Post