श्री बालाजी ब्राम्होत्सव सोहळ्या च्या दुसऱ्या दिवशी श्री बालाजी चा पंचामृत अभिषेक........
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा येथील मंदिरात श्री बालाजी ब्राम्होत्सव सोहळ्या च्या दुसऱ्या दिवशी श्री बालाजी चा पंचामृत अभिषेक व वधू-वर निर्णयम (साक्षगंध) सोहोळा विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथील पराशराम स्व. पट्टाभिरामाचार्यालू यांचे शिष्य लक्ष्मणाचार्यालू महाराजांच्या हस्ते सर्व पंडित पुरोहितांच्या व बालाजी भक्तांच्या उपस्थितीत विधिवत होम हवन करून,
धार्मिक संस्काराणुसार संपन्न झाला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सुदर्शन निमकर व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री वाय.राधाकृष्ण, सुरेश सारडा, प्रा.शंकर पेद्दुरवार, अशोक शहा, शामबाबू पुगलिया, मनोज पावडे, गोरखनाथ शूंभ व ओबालेसू गविनी, सरपंच बाळू वाडस्कर, स्वप्निल शहा, माणिक पिंगे, रवींद्र निमकर, मनोहर निमकर सह मोठ्या संख्येने बालाजी भक्तांनी उपस्थीत राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
आज शनिवार दि. १०.१२.२०२२ रोजी स. ११ ते २ बालाजी चा विवाह सोहळा. दु. २.०० वा. देणगी दात्यांचा सत्कार. २.३० वा. शोभायात्रा. सायं. ६ ते ७ वा. लक्ष्मीनारायण हवन आरती व प्रसाद. रात्रौ ७.३० वा. श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ भेंडाळा तेथील भजन.




