Top News

Lumpy disease outbreak in Shavali Sadoba area...

सावळी सदोबा परीसरात लम्पी आजाराचे थैमान......


आतापर्यंत तिनं गाई व दहा बैलाचा मृत्यू.......



विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी



 आर्णी तालुक्यातील सांवळी सदोबा परिसरातील बहुतांश गावामध्ये लम्पी आजाराने थैमान घातले असून,सावळी सदोबा परिसरातीत बहुतांश गावातील आतापर्यंत तिनं गाई व दहा बैलाचा मृत्यू झाले असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, सावळी सदोबा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या सेंटरमध्ये लम्पी बाधीत पशु १४२, उपचारा नंतर बरे झालेले पशु १०५,तर पशुवैद्यकीय दवाखाना ईचोरा येथे बाधीत पशु ३५ असून बहुतांश पशु बरे झालेले आहेत आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील मौजा माळेगांव येथील एका शेतकऱ्याच्या बैलाला मागील पाच सहा दिवसापासून लम्पी आजाराने ग्रासले होते,त्याचा बुधवारी मृत्यू झाले,त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,माळेगाव येथील शेतकरी शंकर अर्जुन कनाके यांच्याकडे सात एकर शेत जमीन असून,त्यांच्याकडे दोन बैल व गाई आहेत,यातील एक बैल मागील पाच-सहा दिवसापासून काहीच खात नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्यावर इलाज सुरू केले होते परंतु त्या बैलांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला,पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.एम मेहर यांनी लम्पी या रोगाचा प्रसार गोचीड गोमाशी डान्स इत्यादी चावा घेणाऱ्या कीटकापासून होतो,आठवड्यातून दोन ते तीन वेळा गोठा फवारणी करून गोठा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी विशेष मोहीम आजपर्यंत राबवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले, बैलाच्या मृत्यूच्या पंचनामा करून त्याचा अहवाल वरिष्ठांना कळविला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले सदर घटनेमुळे आजूबाजूला असलेल्या पशुपालक तथा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे,

सदरील लम्पी आजाराची लागण झालेल्या सर्व पशुंचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.

Previous Post Next Post