शेतात विज पडल्याने एक एकर कापसाचे नुकसान....शेतकरी चिंतेत.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
शेतकर्याचा शेतात विजपडुण एक एकर कापसाचे नूकसान झाले असुन शेतकरी आता चिंतेत पडला आहे,सदर बाब ही आर्णी तालुक्यातील शिवर तांडा येथील असुन सविस्तर वृत्त असे आहे की,
मारोती रामलाल राठोड राहणार शिवर तांडा यांच्या शेतात दिनांक 12/09/2022 ला विज पडून एक एकर कापसाचे नुकसान झाले असून गेल्या काही दिवसापासून सतत वीजांच्या गर्जनेसह पाऊस सुरू असून शेतकरी चिंतेत सापडले आहे, सततच्या पावसामुळे पराठीच्या पाणि व बोंड फुल शंभर टक्के गळणे सुरू असून शेतकरी आपला उदरनिर्वाह कसा करतील यावीचारात शेतकरी चिंतेत पडला आहे, शेतकरी संकटात असून गेल्या काही वर्षापासून नापिकी होत असून शेतकऱ्यावर अनेक संकटे येतात व तोंडात आलेले पीक अतीवृष्टीमुळीशे वीज पडल्या मुळे व बोंड अळी मुळे शेतकरी वर्ग गरीब होत चालला आहे.
आणि शासन काही मदत करीत नाही त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यसह विदर्भात बरेच शेतकरी आत्महत्या करतात. घेतलेला कर्ज कसा फेडावा या विचाराने शेतकरी आपली जीवन यात्रा संपवतात शेतकऱ्यांना शासनाने भरपूर मदत करावी व शेतमालाला दर्जेदार भाव देण्यात यावा अशी विनंती आता शेतकरी वर्ग शासनाला करत आहे. मात्र शासन यावर आता काय तोडगा काडेल या कडे सर्व शेकर्यांचे लक्ष लागले आहे.



