दोन वेळा पोलिसांची धाड पडल्यावरही कोनाच्या आशीर्वादाने चालतोय क्लब? स्थानीक गावकर्यांनमध्ये सध्या चर्चेचा विषय....
विरूर पोलिसांची वरुर रोड जवळील जुगार अड्ड्या वर धाड....६ आरोपी ताब्यात...
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील विरूर पोलिस वरूर रोड वर गस्तीवर असतांना मुखबीर च्या घबरी वरून माहीती प्राप्त होताच जुगार अड्यावर धाड टाकली धाडीत सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,
सविस्तर वृत्त असे आहे की पोलिस निरीक्षक राहूल चव्हाण पोलिस स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असतांना रात्री 8 वाजता च्या सुमारास मोजा वरूर रोड येथील एका टिनाच्या शेड मधे पैश्याची बाजी लाऊन हार जितचा खेळ खेळीत असतांना पोलिस निरीक्षक राहूल चव्हाण यांच्या चमुने जुगार अड्ड्यावरती धाड टाकली सदर धाडीमध्ये ७९०० रुपये चा मुद्देमाल रोख रकमेसह जप्त करण्यात आला असुन ६ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे,
१) आरोपी व्यंकटा नरसय्या रज्जम गडम वय - ४५ रा - इंधनपली ( तेलंगाणा )
२) जगदीश गोड गडमावर वय - ५५
रा - रामपुर ( तेलंगाणा )
३) सत्यनारायण लाच्मया गुऱ्हम
वय - ५८ रा - असिफाबाद ( तेलंगाणा)
४) कलकी क्रीष्णा चंद्रशेखर वय - ४५ रा - पेदापली ( तेलंगाणा)
५) रमेश रेबंना खणक्या वय -३३ रा - रेबेना ( तेलंगाणा) ६) व्यंकटेश मलया तोटा वय - ३६ रा - मंचेरियाल ( तेलंगाणा)
सदर आरोपींनवर गुन्हा दाखल करून सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे. सदर ठीकानी दोन वेळा धाळ पाळल्या नंतरही हे क्लब कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे स्थानिक गावकर्यांनमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

