Top News

अखेर बल्हारशाह येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यास अटक....चोर निघाला राजुरा येथील 70 वर्षीय वृद्ध......

अखेर बल्हारशाह येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यास अटक....चोर निघाला राजुरा येथील 70 वर्षीय वृद्ध......


2 दुकान फोडून माल लंपास करणाऱ्या 3 विधीसंघर्ष बालकासही अटक‌ तर 1 फरार.....



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

 बल्हारशाह शहरात मागील पंधरवाड्यात चोरांनी धुमाकूळ माजविला होता या अंतर्गत बल्हारशाह शहरातील कारवा रोड वरील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात दानपेटी फोडण्याची घटना घडली होती या घटनेची तक्रार बल्हारशाह पोलिसात दाखल केली असता याचा तपास करून पोलिसांनी या प्रकरणी  70 वर्षीय वृध्द असलेले बंडू मारोती रुद्रपवार हें राजुरा तालुक्यातील रहिवासी असून यांना अटक केली आहे. 


त्या दोन दुकानातील चोरी प्रकरणात विधीसंघर्ष बालकांस अटक.....

तर दुसऱ्या एका प्रकरणात व्यंकटेश एम्पायर मधील ज्वेलरी शॉप व आठवडी बाजारातील किराणा दुकानाच्या चोरी प्रकरणात 4  विधीसंघर्ष बालक असून यापैकी 3 बालकांना ताब्यात घेण्यात आले असून 1 बालक अध्यापही फरार असल्याचे वृत्त आहे. 

विशेष म्हणजे चोरांकडून एक स्प्लेंडर व एक ऍक्टीवा जप्त कऱण्यात आली आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या बालकांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा पुढील तपास  उमेश पाटील, पोलिस निरीक्षक बल्हारशाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, गुन्हे शाखा व त्यांची चमू करीत आहेत.

Previous Post Next Post