हिवरकर रुग्नालयाचे वनसडी येथे थाटात उद्घाटन संपन्न.......
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
कोरपना तालुक्यातील वनसडी येथे श्री हिवरकर रुग्नालयाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटक नामदेवराव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,अध्यक्ष स्थानी नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे सतीश उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, प्रभाकर हिवरकर माझी प्रिसंपल बाळापूर, नारायण पा कोल्हे भाजपा नेते,ओम पवार युवा मोर्चा उपाध्यक्ष, मुंगीलवार, सुधाकर हिवरकर माझी मुख्याध्यापक,डॉ विजय हिवरकर आदी मान्यवर उपस्थित होते नामदेवराव डाहुले जिल्हा महामंत्री यांनी हिवरकर रुग्नालयाचे रीबीन कापून,पुजाअर्चना करून उद्घाटन केले व आपले मनोगत व्यक्त करताना हिवरकर रुग्नालयाचे रितसर उद्घाटन झाले असे जाहीर केले व डॉ. विजय हिवकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला गावातील महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार डॉ. विजय हिवरकर यांनी मानले.
