हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले........
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
हरित क्रांतीचे प्रणेते महानायक माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सावळी सदोबा येथे अभिवादन करण्यात आले, मान्यवरानी वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले वसंतराव नाईक यांची आज पुण्यतिथी साजरी केली यावेळी वसंतराव नाईक यांच्या बद्दल बोलतांना सांगायचे झाले तर एका वर्षात महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत सुखी व समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही नाहीतर माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ असे उद्गार करणारे ही एकमेव मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांची ओळख आहे, वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदावर असताना जल जीवन जल सुविधा शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठमोठे निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला सुखी व समृद्ध करण्यासाठी मोठमोठे योजना आणून शेतकऱ्यांना व महाराष्ट्राच्या गरीब जनतेला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल असे काम केले याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, बंजारा समाजाचे डॉक्टर रामचंद्र चव्हाण, सुरेश पवार, मिलिंद चव्हाण, दिलीप राठोड, अविनाश चव्हाण, अनिल पवार, सुनील राठोड, सुरेश राठोड, व समस्त नागरिक उपस्थित होते.

