Top News

विदर्भातील ऐतिहासिक गाविलगड किल्ला जळून खाक...

विदर्भातील ऐतिहासिक गाविलगड किल्ला जळून खाक...

 

चिखलदरा पर्यटनस्थळी वनसंपदेची राखरांगोळी....


विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील ऐतिहासिक गाविलगड किल्ला गुरुवारी दुपारी १२ पासून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून राख झाली आहे.



गाविलगड हा मेळघाटातील चिखलदरा येथील गिरीदुर्ग प्रकारातील किल्‍ला आहे. बाराव्‍या शतकात गवळी राजाने ( यादव) बांधलेला हा किल्ला मुळचा मातीचा होता. त्यावरूनच त्याला "गाविलगड" हे नाव पडले. आज काही प्रमाणात अस्तित्वात असलेला हा दगडाचा किल्ला बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने इ.स. 1425 मध्‍ये बांधल्याचा उल्लेख " तारिख-ए-फरीश्ता" या ग्रंथात सापडतो. पुढे इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने किल्ल्याची दुरुस्ती व विस्तार केला. इतिहासात महत्‍त्‍वाचे नाव असलेल्‍या गाविलगडचे अस्‍तित्‍व मात्र आज धोक्‍यात आले आहे. भक्‍कम इतिहासाची साक्ष देणा-या खुणा आज पुसल्‍या जात आहे. त्‍यामुळे दुर्गप्रेमींनी चिंता व्‍यक्‍त केली आहे.


विदर्भ माझा न्युज 24 - अमरावती


विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील ऐतिहासिक गाविलगड किल्ला गुरुवारी दुपारी १२ पासून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून राख झाली. किल्ला बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आगडोंब पाहूनच परतावे लागले. धुमसत असलेली आग विझविण्याचे कार्य व्याघ्र प्रकल्पाचे अंगारी कर्मचारी, वनरक्षकांनी केले.


मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागांतर्गत असलेल्या गाविलगड परिक्षेत्रातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याचा परिसर आहे. गुरुवारी दुपारपासून गाविलगड किल्ल्याच्या खोऱ्यात धुमसत असलेली आग किल्ल्यात येऊन पोहोचली. 

त्यानंतर किल्ल्यातील गवत आणि वृक्षांना आगीने कवेत घेतले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत किल्ल्यातील विविध भागात ही आग पोहोचली होती. आग विझवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळकेसह वनपाल, वनरक्षक, अंगारी, वनमजूर ब्लोअर मशीन घेऊन काम करीत होते.

 परंतु किल्ल्याचा मोठा परिसर पाहता सर्वच राखरांगोळी झाल्याचे चित्र होते. हवेच्या जोमाने आग पसरत होती. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मेळघाट आणि वनविभागाच्या जंगलात दररोज मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळला आहे. त्याचा फटका वनसंपदेला व पर्यावरणाला बसत असून वन्यप्राणी सैरावैरा पळत आहेत. सरपटणारे प्राण्यांचा आगीने होरपळून कोळसा होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

बहमनी ते इंग्रज राजवट अशी अनेक स्थित्यंतर या किल्ल्याने बघितली आहेत. किल्ला पाहण्यासाठी गुरुवारी आलेल्या पर्यटकांना दुरूनच आगडोंब पाहून आल्यापावली परत जावे लागले.


Previous Post Next Post