Top News

नंदकिशोर वाढई यांच्या प्रयत्नाने कॅन्सरग्रस्तास मदत.

नंदकिशोर वाढई यांच्या प्रयत्नाने कॅन्सरग्रस्तास मदत. 


विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 




 कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या प्रयत्नाने कळमना येथील कॅन्सरग्रस्त व्यक्ती आत्माराम खेडेकर यांना रामबाबू रामानुजमवार, अतुल आंबटकर, सुनील जोगी, नामदेव पचारे, चंदूजी काळे आणि इतर ९१ जिल्हा  परिषद च्या निवृत्त व कार्यरत सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांनी उच्च न्यायालय प्रकरणातील शिल्लक रक्कम ३० हजार रुपये बक्षीस दिली. या सर्व कर्मचाऱ्यांनी सामाजिक दायित्व दाखवून आत्माराम खेडेकर यांच्यासारख्या गरीब माणसाला कॅन्सर सारख्या भयावह बिमारीसाठी नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकारातून मदत दिली. त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल सरपंच वाढई यांनी सर्वाचे आभार मानले. 



      या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, रामबाबू रामानुजमवार, अतुल आंबटकर, सुनील जोगी, नामदेव पचारे, चंदूजी काळे, दत्तू पाटील पिंपळशेंडे, अमोलजी निमकर, अंकित खेडेकर यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post