कॅन्सर ग्रत व्यक्तीच्या मदतीला धावले श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडल बल्लारशाह
कॅन्सर ग्रस्त व्यक्तीला श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडल बल्लारशाह ने केली आर्थिक मदत
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
बल्लारशाह शहरातील रहीवाशी मनोहर पिपंळकर यांच्या पत्नीला 5 वर्षापूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले तेव्हापासून ते आजपर्यंत सेवाग्राम, सरकारी दवाखान्याने, खाजगी दवाखान्याने ,अलॅपॅथी,आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, सर्व पॅथीवरचे उपचार करून पाहिले परंतू त्याना काहिच फायदा झालेला नाही.
मनोहर ची जवळची सर्व पूंजी उपचारादरम्यान खर्च झाली.आता त्यांच्याजवळ काहीच शिल्लक नाही.मनात खूबसारे विचार येत होते .एक अचानक विचार आला.त्यानी थेट श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडल बल्लारशाह बामणी गाठून एक अर्ज लिहून सादर केला.
संस्थेचे अध्यक्ष यांना कळविण्यात आले.अध्यक्ष श्री पि.यू.जरीले यांनी अर्जाची तुरंत दखल घेऊन माडेकर सर,पुरुषोत्तम पोटे यांना घेऊन त्याच्या घरी जाऊन शहाननिशा करून तातडिची कार्यकारिणीची मिटींग घेऊन कॅन्सर ग्रस्ताना मदत देण्याचे ठरविण्यात आले.
त्यानुसार दि.1-5-2022ला कॅन्सर ग्रस्त पि़पळकर यांचे घरी जाऊन श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडल बल्लारशाह बामणी यांचे वतीने धनादेश देण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष पि.यु.जरीले,उपाध्यक्ष प्रा.एम.यू.बोडे सर,सचिव प्राचार्य आर.एन.खाडे,मनोहर माडेकर, विनायकराव साळवे, संजय लाडे,पुरूषोत्तम पोटे,धनादेश देते वेळी उपस्थित होते.
तसेच श्री पि.यु.जरीले,प्रा.बोडे सर,प्राचार्य खाडे सर,विनायकराव साळवे, मनोहर माडेकर सर,संजय लाडे,प्रदीप मोरे साहेब, पुरुषोत्तम पोटे,यांनीसुद्धा आर्थिक मदत म्हणून काही रक्कम देण्यात आली.ही रक्कम व धनादेश स्वीकारताना अश्रु अनावर झाले.व त्यांनी माझ्या पत्निचे काहीतरी आयुष्य नक्कीच वाढेल असे शब्द उच्चारून सर्वांचे आभार मानले.

