विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे भिम जयंती साजरी......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
बल्लारशाह शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारशाह व रूचिका बहुदेशिय सामाजिक संस्था बल्लारशाह तर्फे दरवर्षी प्रमाणे झाशी राणी चौक येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून मोठ्या उत्साहाने भिम जयंती साजरी करण्यात आली या वेळी कार्यक्रमाला उपस्थित झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारशाह चे अध्यक्ष व मानवाधिकार साहयता संघ शाखा बल्लारशाह चे तालुका अध्यक्ष रोहन कळसकर, झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारशाह चे कार्याध्यक्ष प्रशांत मेश्राम, संयोजक आतिक भैय्या शेख, निशिकांत खैरे, कपिल कळसकर, सुजित पाझारे, सिद्धार्थ खडसे, बबन गाणार, नागेश रत्नपारखी, अश्विजित रामटेके, गोविंदा वनकर
झाशी राणी सांस्कृतिक महीला मंडळ चे लिला कळसकर, प्राची झामरे, रूचिका बहुदेशिय सामाजिक संस्था बल्लारशाह चे अध्यक्षा सुमनताई कळसकर, सोनाली आमटे, माधुरी जिवतोडे, इंदिरा भगत, प्रज्ञा खडसे, सोनम पाझारे, प्रमिला रामटेके, उज्वला रामटेके, त्राई झामरे, वृतिका झामरे व इतर अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

