Top News

रामपूर येथे खुल्या प्लॉट वर असलेल्या लाकडांना व कचर्याला लागली अचानक आग...

रामपूर येथे खुल्या प्लॉट वर असलेल्या लाकडांना व कचर्याला  लागली अचानक आग...


शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवा सेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा




रामपूर येथे नागनाथ घोटेकर यांच्या घराजवळ असलेल्या प्लॉटवरील लाकूडफाट्याला अचानक आग लागली. आगीचा भडका अचानक झाल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये ही आग पसरू शकत होती परंतु ही माहिती मिडताच शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे आणि युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांनी घटनास्थळी पोहचून आजूबाजू शेजाऱ्याच्या मदतीने ती आग विझवायला सुरवात केली आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळाले.



अश्या या परिस्थितीत केलेल्या समयसूचकतेमुळे मोठी हानी होणारी टळली.त्यामुळे नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.याप्रसंगी मदतीसाठी गणपत चौधरी, भारत पिंपळशेडे यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post