जिल्हात वैद्यरित्या दारु विक्रीला सुरुवात होऊनही दारु महेंगीच....
संबंधीत प्रशासनाच्या दुर्लशते मुळे देशी व विदेशी दारुची बे-भाव विक्री सुरु...
मद्य प्रेमिंनमध्ये नाराजगीचे वातावरन.....
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी) धनपालसिंग वधावन,चांदागड(चंद्रपूर):-
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविल्यानंतर जिल्हातील काही शहरात व गावात देशी-विदेशी दारुची विक्री सुरुवात झाली आहे. त्यातूनच जिल्हातील चंद्रपूर,बल्लारशाह, राजुरा तालुक्यातील राजुरा शहर,विरुर स्टेशन,देवड़ा,लक्कड़कोट सह अशा अनेक ठिकाणी वैद्य रित्या दारु विक्रीचे दूकाने उघडले असून खुप मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून येते आहे, आणि प्रत्येक बार मधून दारू विक्री होतांना तेथील सोयी सुविधानुसार प्रिन्ट रेट(छापिल कींमत)पेक्षा जास्त दरात विक्री सुरु आहे असे दारू प्रेमिंनकडून सांगितल्या जात आहे.
प्रिन्ट रेट किंमती पेक्षा सेवा कर म्हणून अंदाजे 25 ते 35 टक्के जास्त दर घेतले जात आहे जिल्हातील बार मध्ये पुरेश्या सुविधा उपलब्ध नसतांना 160 रु ची इम्पीरियल ब्लू (IB) 210 रु., देशी राकेट संत्रा 60 रु ची 70-80 रू., बियर 180रु.ची 250 रुपायने विक्री सुरु असल्याचे मद्यप्रेमींनकडून सांगितल्या जात आहे. तरी या वर कुठल्याच उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्याचे लक्ष दिसत नाही तरी अधिकाऱ्यांनी जास्त आकारल्या जाणाऱ्या दरा विषयी चौकशी करुण विक्रेत्याना योग्य शुल्क आकारन्याची समजूत करुण द्यावी.
सर्रास सुरु असलेल्या बे-भाव दारू विक्री करणाऱ्या बार व्यावसायिकावर व या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी जोर धरल्याचे दिसून येत आहे.
