Top News

Vidarbha_State_Andolan_Samiti_meeting_was_held_at_Umred

 विदर्भ राज्य आंदोलन समिती उमरेड येथील बैठक संपन्न...


विदर्भ माझा न्युज 24 - उमरेड

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती व्हावी . कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल शासनाने माफ करावे . पेट्रोल , डिझेल , गॅसची दरवाढ तातडीने मागे घ्यावी , अशी मागणी करीत विदर्भवाद्यांनी दरवाढीचा निषेध नोंदविला . विदर्भ राज्य आंदोलन  स्थानिक समितीच्या वतीने उमरेड येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाबाबत बैठकीचे आयोजन सागर सोनकुसरे यांनी केले . यावेळी समितीचे मुख्य संयोजक राम नेवले , महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे , युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासूरकर , नागपूर जिल्हा उपाध्यक्ष गुलाब धांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . सागर सोनकुसरे उमरेड शहर अध्यक्ष सोशल मीडिया , गुणवंता बानकर , मयूर देवघरे , आशिष खवास , रोशन चट्टे , रूपेश देवीकर , धनराज माजरीकर , शेखर आमगावकर , कुंदन सहारकर , डुमदेव देवीकर , प्रफुल्ल भुसारी , अमित भुसारी , कुणाल नवलाखे , लकी सोनकुसरे,चेतन कुंभारे आदींनी सहकार्य केले .

Previous Post Next Post