पाटनच्या पहाडावरील शेतकर्यांसह विदर्भातील अन्य शेतकरीही पावसाच्या प्रतिक्षेत...
पुढील ४ ते ६ तासात विदर्भात मेघगर्जने व वादळी वार्यासह पावसाची हजेरी...
विदर्भ माझा न्युज 24 - (चांदागड) चंद्रपूर
पावसाळ्याचे दिवस सुरच होऊनही पावसाचा काही पत्ता नाही,शेतकर्यांना अपेक्षीत असलेल्या पावसाची ते वाट पाहत आहे, विदर्भातील चंद्रपूर जिल्हातील पाटन च्या पाहाडावर राहणार्या कीत्तेक शेतकर्यांची पाऊस न पडल्याने अध्यापही पेरनी झालेली नाही,
जर का अपेक्षीत पाऊस पडला नाही तर कोरडवाहु शेती करणार्या शेतकर्यांचे कीती नूकसान होईल याची आपन कल्पनाही लाऊ शकत नाही,पाटन पाहाडावरील शेतकर्यांसह विदर्भातील अन्य शेतकरी सुद्धा जिवाच्या आकांताने पावसाची प्रतिक्षा करीत आहे, पावसाळा सूरू होऊनही उन्हाचे लागनारे चटके सोसत शेतकरी शेतात बियाने घेऊन पावसाची आकांताने वाट पाहात आहे,मात्र शेतकर्यांना अपेक्षीत असलेला पाऊ काही अध्याप पडलेला नाही त्यामूळे शेतकरी सद्या चिंतेत आहे,
तर पुढील 4 ते 6 तासांच्या दरम्यान विदर्भात पावसाची सुरवात होनार असुन अमरावती,भंडारा,चंद्रपुर,गडचिरोली,हिंगोली,नागपुर,वर्धा,वाशीम, यवतमाळ व नांदेड जिल्हात बर्याच ठीकनी मेघगर्जना व जोराच्या वार्यासह पावसाची शक्यता वर्तवीली जात आहे.


