विदर्भ राज्य आंदोलन समितीची मुर्तीजापुर व अकोला बैठक संपन्न..
जिल्हा परीषद व पंचायत समीती पोट निवडणुक लढवीन्याचा ठराव सर्वानुमते झाला पारीत.....
विदर्भ माझा न्युज 24 - मुर्तीजापुर
दी . 28/06/2021 सोमवार ला संध्याकाळी 05:00 वाजता बैठकीचे नियोजन अरविंद तायडे व योगेश हरणे यांनी केले .पोटनिवडणुकीत जि . प . व पं . स . निवडनुक लढ्विणे बाबत चर्चा करण्यात आली व जि . प . पंचायत समिती ची निवडणुक लढ्विणे हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. निवडणुक लढविण्यासाठी उमेदवार यांची चाचपणी करण्यासाठी स्थानीक कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन उमेदवार यांची अंतीम यादी लवकरच जिल्हा कार्यालय येथे सादर करण्याकरिता कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले .
अरविंद तायडे यांनी अकोला जिल्यातील अकोला तालुक्यातील कुरणखेड जि . प . व पंचायत समिती चे उमेदवार यांचे नावे दिली व लवकरच उमेदवारांची नावे विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे हे वरिष्ट नेत्यांन सोबत चर्चा करून जाहीर करतील असें बैठकीत ठरलवीन्यात आले आहे .बैठकीला सुरेशभाऊ जोगळे (जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती ), अरविंद तायडे (तालुकाध्यक्ष वि . रा . आ . स . मुर्तीजापुर )महादेवराव पाटील , सागर पंडीत (वि.रा.आ.स. सोशल मिडीया प्रमुख, कानडी), योगेश हरणे (युवक आघाडी तालुकाअध्यक्ष वि . रा . आ . स . मुर्तीजापुर ), गोपाल साबळे , सय्यद जमीर भाई , पंकज वानखडे , सह असंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थीत होते .
