Top News

X-MLA_Sudarshan_Nimkar_inaugurates blood_donation_camp_at_Dhidsi

माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते धीडसी येथे रक्तदान शिबीराचे उदघाटन.          



(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनिधी)मनोज श्रिहरी गोरे,राजुरा :-

                         राजुरा पं.स.अंतर्गत धिडसी ग्रा.पं.चे उपसरपंच राहुल सपाट यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कोरोनाच्या या कठीण काळामध्ये रक्ताची निर्माण झालेली टंचाई व शासनाने रक्तदान करण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दि.27.06.2021 रावीवर ला धिडसी येथील युवकांनी रक्तदान शिबिराच्या व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते व माजी आमदार ऍड.संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली तथा भाजपा तालुका अध्यक्ष व जि.प.चे कृषी पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, सरपंच कु. रिता हणमंते, उपसरपंच राहुल सपाट,भाजपा जिल्हा सचिव व खमोना ग्रा.पं.चे सरपंच हरिदास झाडे,


भाजयुमो चे तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, भाजप चे कार्यकर्ते नितीन बाम्बरटकर, माजी सरपंच मधुकर पा. काळे, डॉ. नारायण काकडे, सृष्टी बहुउद्देशीय संस्थेचे संचालक अनिल पोडे, गौरीहर टोंगे, मारडा चे पो. पा. सतीश भोयर, ग्रा.पं.धिडसी चे सदस्य संतोष काकडे विनोद कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या रक्तदान शिबिरात छोट्याश्या गावातील 29 युवकांनी रक्तदान करून नवा आदर्श निर्माण करून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतल्या बध्दल युवकांचे अभिनंदन केल्याजात आहे. विशेष म्हणजे धीडसी या गावात 45 वर्ष वयोगटाच्या वरील नागरिकांचे 100% लसीकरण करवून जिल्ह्यातुन प्रथम आल्याबद्धल ग्रा.पं.चे पदाधिकारी, सदस्य व युवक कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे पाहुण्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका सौ. वरघणे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post