चंद्रपुर जिल्हातली महाग दारु स्वस्त केल्या बद्दल सरकराचे धन्यवाद - पराग गुंडेवार.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह :-
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षा पासून दारू बंदी होती २०१४ मध्ये महाराष्ट्रात सतेत आलेल भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकार ने मिळुन चंद्रपुर जिल्हातली दारु बंद केली होती,
मात्र ज्या आवेगाने दारूबंदी करण्यात आली. त्याच आवेगाने त्या ५ वर्षांत दारूबंदी कडकपणे लागू करण्यात आली न्हवती. उलट या ६ वर्षाच्या काळात अवैध दारू विक्री दुप्पटीने वाढल्याचे अनुमान दिसून आले,युवा वर्ग या दारुबंदी मुळे अवैद्य दारू तस्करीत गुंतला गेला,तर या दारुबंदी मुळे कीतैक लोकांचे व्यवसाय ठप्प झाले कीत्तेकांचे घर उध्वस्त झाले, एखाद्या बार,वाॅइन शाॅप च्या बाहेर कीत्तेक हात ट्रालीवर खाद्य पथार्थ(चकना) विकुन आपल्या पोटची भुक भागवनारे बेरोजगार झाले,वेटर सुद्धा बेरोजगार झाले.
आनी या दारु बंदी मुळे अवैद्धरित्या दारु तस्करीला जिल्हात उत आले,राज्य शासनाला मिळणारा मोठा महसूल सुद्धा बुडाला. शालेय विद्यार्थी, तरूण पिढी सुद्धा झटपट पैसा कमवायचा म्हणून अवैध दारू विक्री व्यवसायात दिसू लागली. सभोवतालच्या परिसरात जिथे तिथे अवैध दारू विक्री आणि पिण्याच्या प्रमाणात वाढ झाली. नकली दारूचे प्रकार सुद्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागलेत. सामाजिक आरोग्यास धोका निर्माण झाला. ५० रु चि देशि दारू १०० तर इंग्रजी दारू १२० येवजी ३००/३५० रू. कींमतीला विकली जायची,११०ची बियर ३०० रुपयला विकली जात आहे, दारुबंदी मुळे पिनार्यांचा संखेत घटन होता वाढ झाली आहे,गुन्हेगारीत सुद्धा वाढ झाली आहे,दारूबंदी हि फसवी दारु बंदी होती,
जर दारूबंदीची पुर्णपणे कडक अंमलबजावणी झाली असती तर आज नागरिकांनी फसवी दारूबंदी उठवण्याची मागणीच केली नसती आणि सरकारला दारू बंदी उठवायला संधीच मिळाली नसती. चंद्रपुर जिल्हातील दारू बंदी झालीच न्हवती तर जिल्हात दारू महेंगी होती मात्र आता च्या सरकार ने परत दारू स्वस्त केली आहे, महाविकास आघाडी सरकारने फसव्या दारू बंदीने त्रस्त नागरिकांच्या लोक इच्छे नुसारच दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो.
