गडचिरोली जिल्हात होनार दारू सुरू?बघा काय म्हनाले विजय वडेट्टीवार...
विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली :-
चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोलीतील दारूबंदी उठविण्यात यावी ही येथील जनतेची भावना असून आपण आपण देखील याच मताचे आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिली. गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
'दारूबंदी करतांना जे उद्देश ठेवण्यात आले होते, ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तरीसुध्दा जिल्ह्यातील काही तथाकथित समाजसेवक स्वार्थापोटी दारूबंदीचे समर्थन करतात. मात्र, त्यांच्या मागे येथील नागरिकांचे समर्थन नाही', असं ते म्हणाले. समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. सोबतच गडचिरोलीतील लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता दारूबंदीच्या विरोधात असून पालकमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन समीक्षा समिती स्थापन करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
