थातूरमातूर मदत करून प्रकरण दाबण्याचा CTPS चा प्रयत्न - राजु झोडे
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड(चंद्रपुर) :-
प्रकल्पग्रस्त कामगारांची जमीन CTPS मध्ये मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याऐवजी थातूरमातूर मदत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न नेहमी CTPS कडून केल्या जाते. मृतक प्रदिप धानोरकर हे प्रकल्पग्रस्त कामगार होते व त्यांचा कामावरच अपघाती मृत्यू झाला. परंतु सिटी CTPS च्या विद्यमान अधिकाऱ्यांनी फक्त दोन लाख रुपये आणि परिवारातील एकाला कंत्राटी कामगार म्हणून नेमण्यात येईल असे आश्वासन दिले. प्रकल्पग्रस्त कामगारांना नियमित कामगार आहेत त्यांच्या प्रमाणे मोबदला देण्यात यावा व परिवारातील सदस्यांना नियमित नोकरी देण्यात यावी अशी मागणी उलगुलान कामगार संघटनेकडून करण्यात आली.
जर मृतक प्रदिप धानोरकर याच्या परिवाराला नियमित नोकरी व योग्य मोबदला मिळाला नाही तर उलगुलान कामगार संघटनेकडून संपूर्ण CTPS चे काम बंद पाडू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी CTPS प्रशासनाला दिला.

