Top News

जब तक सूरज चांद रहेगा महाराणी ''हिराई आत्राम'' आपका नाम रहेगा.

जब तक सूरज चांद रहेगा महाराणी ''हिराई आत्राम'' आपका नाम रहेगा.


राजमाता राणी हिराई यांचा जन्म 20 एप्रिल 1668 मधे झाला.




  ( विदर्भ माझा न्युज 24 ) चांदा :-   दक्षिन गोंडवाना ची राजधानी चांदागड (चंद्रपुर) या चांदागड ची पाया उभारणी राजमाता राणी हिराई बिरशाहराजे आत्राम ने केली महांकाली मंदिर, एकवीरा माता मंदिर, अंचलेश्वर मंदिर या सगळ्या वस्तुकला राज माता राणी हिराई यांच्या कार्यकाळात झालेल्या आहेत इतकेच नव्हे तर शाहजान ने मुमताज साठी जे ताजमहल बांधल हे सर्वांनाच माहीती आहे पन त्याच प्रकारे "राजमाता राणी हिराई ने आपले पती गोंडराजे बिरशहा महाराज यांच्या मृत्यु नंतर त्यांची आठवण म्हणून भव्य-दिव्य ताजमहल बांधले" आज ही आपल्याला अंचलेश्वर मंदिर परिसरात विदर्भा चा ताजमहल पहावयास मिळतो...


      राणी हिराई च्या 15 वर्षाच्या कार्यकाळात या चांदागडा वर अनेकांनी आपली सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते.  गोंडवाना ची रणरागिनी गोंड राज्याची महिला शासक राणी हिराई ने आपल्या कार्यकाळात मोगल आणि मराठा साम्राज्या सोबत 17 युध्द छेडले आणि त्यात त्या विजय सुद्धा झाल्यात इतका मोठा इतिहास या चांदागड (चंद्रपुर) मधील गोंड महिलेचा आहे...

     

      पण इथल्या आजी-माजी आमदार-खासदार, शाशन-प्रशासनाच इथल्या वास्तु कडे लक्ष नाही. एका महिले ने आपल्या पती च्या प्रेमा पोटी भव्य-दिव्य समाधि बांधली त्याची कोणत्याच इतिहासा नोंद नाही "विदर्भा चा ताजमहल" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रा मधे चंद्रपुरातल्या वस्तु च प्रचार-प्रसार करायला से तयार नाहीत.

     इथल्या शासन-प्रशासन राजकीय नेत्यांना आम्हाला मागणी करावी लागते राणी हिराई  च्या भव्य-दिव्य पुतळ्या साठी, एखाद्या चौकाला राणी हिराई च नाव देण्यासाठी आणि मागणी करूनही मागणी पूर्ण होत नाही ही किती मोठी शोकांतिका आहे धिक्कार आहे इथल्या नेत्यांचा जिस थाली में खाते है उसीमे छेद करते हैं .अशी टीका गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सारंग कुमरे,सचिव पलाश पेंदाम यांनी केली आहे तर आज राजमाता माॅ साहेब हिराई रानी आत्राम यांच्या जयंती दीनी स्थनिक प्रशासन महानगरपालिका महानगरातील महापौर आजी-माजी आमदार-खासदार, शाशन-प्रशासनाच व आदिवासी लोकप्रतिनिधिंचा यांचा जाहिर निषेध आज गोंडवाना विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले.

तर संपुर्ण जनतेला गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सारंग कुमरे,सचिव पलाश पेंदाम तर्फे चांदागड (चंद्रपुरची) महीला शासक चांदा नगरीची शिल्पकार राज माता राणी हिराई जन्मदिना च्या हार्दिक शुभेच्छा...

Previous Post Next Post