मानवी उपचारा साठी वापर करून झालेले एक्सपायर इंजेकशनचा गावा लगत टाकलेला ढीक त्वरीत उचलावा. - प्रितम पाटनकर
( विदर्भ माझा न्युज 24 ) गोंडवाना विसापुर :- दिनांक 19/04/2021 ला स्वराज्य सामाजिक संघटना जि.चांदा(चंद्रपूर) /प्रहार जनशक्ती पक्ष चांदा(चंद्रपूर) विसापूर तर्फे ऑनलाईन व्हॅटप्पच्या माध्यमतुन व भ्रमणध्वनीवर संपर्क करून विसापूर ग्रामपंचायत कार्यालय सरपंच/उपसरपंच व सचिव यांना निवेदन पाठवीन्यात आले,
विसापूर मध्ये वॉर्ड नं. 1 बल्लारशाह मार्ग पुरबुडी जवळ त्या भागा मध्ये मानवी उपचारा साठी वापर करून झालेले एक्सपायर इंजेकशन त्या ठिकाणी रोड चा बाजूला टाकण्यात आले आहेत अशी माहित मधुकर भोयर यांनी दिली होती तर स्वराज्य सामाजिक संघटना /प्रहार जनशक्ती पक्ष चांदा(चंद्रपूर) विसापूर मध्ये असलेले सामाजिक कार्यकर्ता प्रितम पाटणकर यांनी तात्काळ ते उचलून विसापूर गवाचे बाहेर टाकण्यात यावे कारण तिथे जवळच नागरिकांचे घर आहेत व त्या रोड वरून शेतीकरी आपल्या शेतामध्ये ये जा करत असतात व लहान मुलं सुद्धा असतात, व त्या भागा मध्ये गुरे जनावरे येणे-जाणे करती असतात म्हणून त्या इंजेक्शनच्या ढगामुळे कोणत्याही प्रकारचे कोणत्या प्राण्यांना, नागरिकांना हानी/दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी व तात्काळ तिथून उचलून कुठे तरी गावाच्या बाहेर टाकावे असे निवेदनचा मार्फत सांगण्यात आले व लवकरच समस्याचे निवारण होणार असे विसापूर ग्रामपंचायत कार्याला चे उपसरपंच अंकेश्वर मेश्राम यांनी निवेदण कर्ता प्रितम पाटणकर यांना सांगीतले आहेत.
