Top News

सामान्य लोकांच्या हितार्थ लॉकडाऊन शिथील करण्यात यावे:- राजू झोडे

 

सामान्य लोकांच्या हितार्थ लॉकडाऊन शिथील करण्यात यावे:- राजू झोडे


वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.




   (विदर्भ माझा न्युज 24) बल्लारशाह :-     मागील वर्षीपासून कोरोना या महामारीमुळे समस्त देशातील जनता त्रस्त आहे. व्यापारी, कामगार, गरीब वर्ग व सर्वसामान्य जनता मागील वर्षीपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हळूहळू जीवनमान पूर्वपदावर येत असतानाच अचानक कोरोना पुन्हा वाढू लागला. त्यामुळे सरकारने व प्रशासनाने कडक निर्बंध लावून हळूहळू जनतेला लाकडाऊन च्या दिशेने नेत आहे. कोरोना रोखण्याकरिता लाकडाऊन हा पर्याय नसून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग याप्रमाणे कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. लॉकडाउन लावून दुकाने बंद करणे, बाजारपेठा बंद करणे‌ किंवा इतर आस्थापने बंद करणे ह्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हातावर आणून पोटावर खाणाऱ्या सर्वसामान्य गरीब वर्गाचे प्रचंड हाल होतात. छोटे दुकानदार, मजूर, व्यापारी यांचेवर उपासमारीची पाळी लाकडाऊन मुळे येण्याची शक्यता आहे. करिता लाकडाऊन हा पर्याय नसून कोरोना रोखण्याकरिता कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे याकरिता बल्लारपूर येथील लाकडावून तात्काळ शिथील करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

       निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, संपतभाऊ कोरडे, झाकीर खान भूषण पेटकर मनोज बेले सचिन पावडे मुकिम सिद्दिकी तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post