Top News

ग्रामीण भागातील इंदिरा आवास घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करा.

 ग्रामीण भागातील इंदिरा  आवास घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करा.



 राष्ट्रीय क्रांतिकारक विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांची मागणी.



(विदर्भ माझा न्युज 24 - विषेश प्रतीनीधी)राजीक शेख,माहुर :-  ग्रामीण भागातील जनतेला हक्काचे घर मिळावे या उद्देशाने शासनाने ग्रामीण भागात इंदिरा आवास घरकुल योजना राबविल्या जात आहे .

 परंतु ह्या घरकुलाच्या बांधकामा करिता मिळणारे अनुदान तुटपुंजे असल्याने घराचे बांधकाम करीत असताना आर्थिक अडचण निर्माण होत आहे .

ग्रामीण भागात सर्वात जास्त लोकसंख्या वास्तव्यास असून इंदिरा आवास  घरकुल बांधकामा करिता अनुदान १.५० लाख रुपये दिले जाते तर शहरी भागात 2.५०  लाख रूपये  रक्कम अनुदान शासन स्तरावर दिले जात आहे .

  सध्याच्या परिस्थिती मध्ये विटा , लोहा, सिमेंट व इतर साहित्य किमती मध्ये वाढ झाल्याने १.५०.  लाख रुपये अनुदानात   घर बांधणे अवघड झाले आहे .

  त्यामुळे घरकुलाचे बांधकाम करीत असताना साहित्य खरेदी करावे की  मजुरी, सेंट्रींग चे  पैसे मोजावे असा प्रश्न ग्रामीण भागातील घरकुल  मिळालेल्या व नव्याने घरकुलाची  मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे .

शासनाने शहरी व ग्रामीण भाग असा भेदभाव न करता  ग्रामीण भागातील इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना  २.५०  लाख रुपये घरकुल करीता अनुदान  देण्यात यावे अशी मागणी  राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांनी केली आहे .

तसेच इंदिरा आवास घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करण्या संबधी प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव घेऊन शासणा कडे प्रस्ताव पाठवुन सदर मागणी बाबत पाठपुरावा करावे अशी विनंती रूस्तम शेख यांनी केली आहे .

Previous Post Next Post